Join us

टुरिस्ट वाहनांच्या अवैध पार्किंगवर कारवाई करा, वाहतूक सहआयुक्तांचा पाहणी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 2:18 AM

शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे रस्ता मोकळा झाला असला, तरी त्याची जागा सध्या अनधिकृत पार्किंग करणा-या वाहनांनी घेतली आहे.

मुंबई : शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे रस्ता मोकळा झाला असला, तरी त्याची जागा सध्या अनधिकृत पार्किंग करणा-या वाहनांनी घेतली आहे. शहरातील अन्य ठिकाणांसह विलेपार्ले येथेदेखील अनधिकृत पार्किंगच्या विरोधात रहिवाशांनी आवाज उठविला होता. रहिवाशांच्या हाकेला प्रतिसाद देत, वाहतूक पोलीस विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांनी टुरिस्ट वाहनांसह अनधिकृतरीत्या उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.विलेपार्ले येथे रहिवाशांना रस्त्यावरून चालताना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागते. मुंबई विमानतळ येथे वाहनतळांसाठी शुल्क आकारण्यात येते. परिणामी, टुरिस्ट वाहनचालक वाहने उभी करण्यासाठी विलेपार्ले येथील विविध ठिकाणांचा आसरा घेतात. यामुळे गाड्या धुणे, पदपथावर चालकांच्या जेवणासह सर्व गोष्टी रस्त्यावर होत आहेत. विशेष म्हणजे, रस्त्याच्या कडेला वाहनांच्या चालकांच्या टोळ्या रस्त्यावर उभ्या राहतात. यामुळे स्थानिक महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.या धर्तीवर वाहतूक पोलीस सहआयुक्त अमितेश कुमार यांनी विलेपार्ले येथे पाहणी दौरा केला. या वेळी कुमार यांनी संबंधितांना अनधिकृत पार्किंग करणाºया वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिलेला आहे. पाहणी दौºयात कुमार यांच्यासमवेत आमदार पराग आळवणी उपस्थित होते.>कारवाई आणि सूचनाअनधिकृत पार्किंगबाबत रहिवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार, पाहणी दौºयात संबंधित वाहतूक पोलीस चौकीमध्ये बसून, एकेका परिसराबाबत सविस्तर चर्चा करून त्याबाबत आवश्यक आदेश दिले. त्यात अनधिकृत पार्किंग करणाºया टुरिस्ट गाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेआहेत, तसेच टुरिस्ट दलालांवरदेखील कारवाईचा बडगा उगारणार आहे, शिवाय वाहतुकीबाबत सूचनाही केल्या आहेत. यात सिग्नलच्या कालावधीत बदल करणे, तसेच काही ठिकाणी वनवेमध्ये बदल करणे, मार्केट परिसरात गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना बंदी घालणे यांचा समावेश आहे.- अमितेश कुमार, सहआयुक्त, वाहतूक विभागअनधिकृत पार्किंगनेहरू रोडदयालदास रोडगुजराती सोसायटी रस्ताडहाणूकर व साठ्ये महाविद्यालय परिसररामभाऊ बर्वे मार्गपार्ले टिळक शाळा परिसर व महात्मा गांधी रोड (मार्केट परिसर)

टॅग्स :कारपार्किंग