Join us

kirit somaiya: 'ट्विन टॉवर'प्रमाणे मुंबईतही कारवाई करा, किरीट सोमय्यांच्या रडारवर आता मुंबईतील इमारती!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 10:48 AM

नोएडामधील अनधिकृत आणि भ्रष्टाचाराचे 'ट्विन टॉवर' पाडले, पण मुंबईत उभ्या असलेल्या बेकायदेशीर इमारतींचं काय? मुंबईतही अनेक बिल्डरांकडून इमारतींना ओसी मिळण्यासाठी प्रयत्नच केले गेलेले नाहीत.

मुंबई-

नोएडामधील अनधिकृत आणि भ्रष्टाचाराचे 'ट्विन टॉवर' पाडले, पण मुंबईत उभ्या असलेल्या बेकायदेशीर इमारतींचं काय? मुंबईतही अनेक बिल्डरांकडून इमारतींना ओसी मिळण्यासाठी प्रयत्नच केले गेलेले नाहीत. रहिवाशी मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जात आहेत. याच प्रश्नाबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असल्याची माहिती भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

Twin Tower पाडण्याच्या काही तास आधी बिल्डिंगमध्येच गाढ झोपला होता तरूण, त्यानंतर जे काही झालं ते...

मुंबईत अनेक बिल्डर नागरिकांची फसवणूक करतात. अनेक इमारती आजही अनधिकृतपणे उभ्या आहेत. नोएडातील ट्विन टॉवरप्रमाणे मुंबईतही कारवाई करा, असं आवाहन सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे. शिवसेना-राष्ट्रवादीतील नेत्यांवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा आता मुंबईतील अनधिकृत टॉवरच्या दिशेनं वळवल्याचं पाहायला मिळत आहे. सोमय्या यांनी मुंबईतील बेकायदेशीर टॉवरबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. 

10 सेकंदात जमीनदोस्त झाले ट्विन टॉवर; भ्रष्टाचाराचे 'शिखर' कोसळले!

"काल नोएडातील अनधिकृत ट्विन टॉवर पाडण्यात आले. मुंबईत असे शेकडो अनधिकृत टॉवर, हजारो अनधिकृत मजले गेली अनेक वर्ष बांधण्यात आले आहेत. उभे आहेत. त्यातील मध्यमवर्गीय सदनिकाधारक असुरक्षित, भीतीत आहेत त्यांचं काय याची चिंता वाटते", असं किरीट सोमय्या यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने नोएडातील ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश दिले त्याचे स्वागत आहे. यामाध्यमातून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील अशा हजारो सदनिकाधारकांची काळजी करावी अशी विनंती आहे, असंही सोमय्या म्हणाले. 

मुंबईतील अनेक सदनिकाधारकांना गेल्या अनेकवर्षांपासून ओसी किंवा पार्ट ओसी मिळालेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील असे अनधिकृत टॉवर्स, मजले, ज्या इमारतींना अद्याप ओसी मिळाले नाही किंवा पार्ट ओसीही नाही अशा इमारतींचे स्पेशल ऑडिट करावे, अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे. 

टॅग्स :किरीट सोमय्या