Join us  

कारवाई करा, नाहीतर कामबंद आंदोलन!

By admin | Published: May 08, 2017 6:48 AM

महापालिकेच्या एच/पश्चिम विभागाच्या परिरक्षण खात्यातील कामगाराला कामाच्यावेळी मंगळवारी स्थानिक दुकानदार आणि त्याच्या तीन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेच्या एच/पश्चिम विभागाच्या परिरक्षण खात्यातील कामगाराला कामाच्यावेळी मंगळवारी स्थानिक दुकानदार आणि त्याच्या तीन साथीदारांनी मारहाण केली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असला, तरी अटक झालेली नाही. परिणामी, सोमवारपर्यंत आरोपींना अटक झाली नाही, तर कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्याचा इशारा म्युनिसिपल मजदूर संघाने दिला आहे.संघाचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितले की, वल्लीउद्दीन शेख असे मारहाण झालेल्या कामगाराचे नाव आहे. या मारहाणीत जखमी झालेले वल्लीउद्दीन वांद्रे येथील के.बी. भाभा रूग्णालयात उपचार घेत आहेत. आरोपींनी कामगाराला मारहाण करताना मोबाईल आणि ओळखपत्र काढून घेतले. महापालिका कर्मचाऱ्याला सेवेत असताना मारहाण करून मोबाइलची तोडफोड करणे आणि त्याचे ओळखपत्र हिसकावून घेणे, हे गंभीर प्रकरण आहे. तरीही गुन्हा दाखल करणारे पोलीस प्रशासन आरोपींना अटक करण्यास दिरंगाई करत आहेत.आरोपींना अटक करण्याची मागणी करत संघटनेने गुरूवारी पोलीस ठाण्यावरच मोर्चा काढला होता. त्यावेळी वरिष्ठांनी याप्रकरणी सोमवारपर्यंट ठोस कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सोमवारपर्यंत पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही, तर कामबंद करण्याचा निर्णय संघटनेला घ्यावा लागेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या समस्येस, सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.