Join us

अनामत रक्कम घेणाऱ्या शाळांवर कार्यवाही करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 5:47 AM

उपसंचालक कार्यालय; शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निर्देश

मुंबई : मुंबईतील अनेक आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये पूर्वप्राथमिक शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर सध्या लाखो रुपयांची अनामत रक्कम मागितली जात असल्याचे समोर आले आहे. या संबंधित प्राप्त तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विभागीय शिक्षण निरीक्षकांना मुंबई उपसंचालक कार्यालयाने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोबतच ठाणे, पालघर, रायगड येथील जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाºयांनाही यासंबंधित निर्देश दिले आहेत. संबंधित अधिकाºयांनी केलेल्या कार्यवाहीची प्रत आणि अहवाल उपसंचालक कार्यालयाला सादर करण्याचेही नमूद करण्यात आले आहे.

पाल्याच्या शाळा प्रवेशावेळी डोनेशन घेण्यास बंदी आहे. त्याऐवजी अनामत रक्कम घेण्याची मुभा शाळांना आहे. ही रक्कम ठरविण्याचा अधिकार सर्वस्वी शाळांना देण्यात आल्याने शैक्षणिक संस्थांकडून मनमानी सुरू असून, ही रक्कम लाखोंमध्ये मागितली जात असल्याचा पालकांचा आरोप आहे. मुलांना शाळा शिकविण्यासाठी कर्ज काढायचे का, असा सवाल करत पालक शैक्षणिक संघटनांकडे तक्रारी करत आहेत. शाळांच्या या आडमुठे धोरणामुळे पालक, विद्यार्थ्यांचे मनोबल खच्ची होत असून शिक्षण महाग झाल्याची प्रतिक्रिया मनविसेचे चेतन पेडणेकर यांनी दिली. त्यांनी यासंबंधी मुंबई उपसंचालक कार्यालयाला भेट देऊन याची माहिती उपसंचालकांना दिली. त्याची दखल घेत उपसंचालकांनी शिक्षण निरीक्षकांना अनामत रक्कम घेणाºया शाळांवर कार्यवाहीच्या सूचना दिल्या. 

टॅग्स :शाळाविद्यार्थी