मुंबई - मुंबईहून जयपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या जेट एअरवेजच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत जेट एअरवेजच्या कार्यालयावर वॉचडॉग फाउंडेशनच्या सुमारे 50 कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढला. गुरुवारी पहाटे जयपूरला निघालेल्या विमानातील प्रवाशांच्या नाकातून रक्तश्राव येत होता. याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली.
एअरवेजच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे निवेदन देऊन सहारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले, अशी माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे संचालक निकोलस अल्मेडा व अँड.ग्राडफे पिमेटा यांनी दिली. जेट एअरवेजच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमाळा जवळ हॉटेल ग्रँड मराठा जवळ असलेल्या सिरोंया सेंटरवर धडक देऊन वॉचडॉग फाउंडेशनने यावेळी जोरदार निदर्शने केली. तसेच जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दुखापत झालेल्या जेटच्या विमानातील सुमारे 30 प्रवाश्यांच्या वैद्यकीय खर्चाचे बिल व त्यांना नुकसान भरपाई देखिल जेट प्रशासनाने द्यावी अश्या मागण्यांचे निवेदन जेट एअरवेजच्या उप महाव्यवस्थापकांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.