सध्या खासगी अनुदानित आणि सरकारी शाळांच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, पाल्यांसाठी पालकांकडून खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची लगबग सुरू झाली आहे. पाल्यांचे आधारकार्ड, तर कागदपत्रांची जमवाजमव सुरू आहे. परंतु, ज्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश घेणार आहेत, ती शाळा शासनमान्य, विनाअनुदानित, अनुदानित आहे का याचा विचार, त्याची शहानिशा पालकांनी करायला हवी, असे शिक्षणतज्ज्ञाचे म्हणणे आहे.
मुलांचा शाळाप्रवेश घेताना संबंधित शाळेला शासनाकडून मान्यता आहे किंवा नाही, याची शहानिशा फारशी कोण करत नाही. तसेच, डोनेशन बंदीचा महाराष्ट्र शासनाचा १९८७ चा कायदा आहे. याबाबत आपण जागरुक राहिले पाहिजे. शाळांमध्ये आरटीईनुसार पहिली ते आठवीपर्यंत ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, तर माध्यमिकसाठी ३५ ते ४० विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक असे प्रमाण हवे, शाळांमध्ये त्यांचे प्रशिक्षण झालेले असावे, याची माहिती पालकांनी आधी घेतली पाहिजे, प्रवेशाचा विचार केला पाहिजे, असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात.
मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाकडून मिळालेल्या २०२४ च्या माहितीनुसार मान्यताप्राप्त नसलेल्या खासगी प्राथमिक शाळा १२७ आहेत. यामध्ये २१,७५१ विद्यार्थी शिकतात, तर ८८५ शिक्षक कार्यरत आहेत.
मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांची तालुका, वार्डनिहाय फ्लेक्स, बॅनरवर माहिती राजकीय पक्ष आणि शासनानेही लावावी. यामधून जनतेचे प्रबोधन होईल.- अरविंद वैद्य, शिक्षण तज्त्र, मुंबई
मान्यताप्राप्त नसलेल्या ज्या खासगी शाळा आहेत. त्या नियमबाह्य असतील, तर त्यामधील विद्यार्थ्यांचे भले करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना अनुदानित शाळांमध्ये स्थानांतरित करावे. - संजय पाटील, मुख्याध्यापक महासंघ
अशा शाळा, इतके विद्यार्थीयुनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम या विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध २०२२ च्या आकडेवारीनुसार मान्यताप्राप्त नसलेल्या मुंबईतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या १४७ शाळांमध्ये २०,९८९ विद्यार्थी होते. पहिली ते आठवीच्या ५४ शाळा मिळून ३०१ शाळांमध्ये ८,१९७ विद्यार्थी शिकत होते.