Join us  

‘काळजी करण्यापेक्षा क ाळजी घ्या’ मोहिमेद्वारे शहर पोलिसांचा जनजागर

By admin | Published: October 24, 2015 1:12 AM

‘काहीतरी कर ठाणेकर’ या टॅगलाइनखाली लोकमतने ठाणेकरांसाठी चळवळ हाती घेऊन ती यशस्वी केली. तोच धागा धरून ठाणे शहर पोलिसांनी आता ‘काळजी करण्यापेक्षा काळजी

- पंकज रोडेकर,  ठाणे‘काहीतरी कर ठाणेकर’ या टॅगलाइनखाली लोकमतने ठाणेकरांसाठी चळवळ हाती घेऊन ती यशस्वी केली. तोच धागा धरून ठाणे शहर पोलिसांनी आता ‘काळजी करण्यापेक्षा काळजी घ्या’ या टॅगलाइनखाली जनजागृती मोहीम शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत फलकांद्वारे सुरू केली आहे. त्या फलकांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र असेल. त्याचबरोबर ‘सबको सन्मती दे भगवान’, असे घोषवाक्य दिसत असून महाराष्ट्र पोलीस असा उल्लेख केलेला आहेत. एवढेच नाहीतर ठाणेकर मराठी क लाकारांच्या माध्यमातून ‘जनप्रबोधन’ करण्यासाठी शॉर्टफिल्म तयार केल्या आहेत.शहर पोलिसांचा पसारा दिवसेंदिवस वाढत असल्याने आयुक्तालयात पोलीस ठाण्यांची संख्या वाढत आहेत. पोलीस ठाणे वाढण्याची मुख्य कारणे ही वाढत्या शहरीकरणांबरोबर गुन्ह्यांची संख्या आहे. त्यातच, आधुनिक काळात गुन्हेगारही हायटेक झाले आहेत. नाना शकला लढवत ते नागरिकांना हेरून गुन्ह्यांची संख्या वाढते. हे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मध्यंतरी देशभरात दहशतवादी सावट असताना पोलिसांनी एक शॉर्टफिल्म तयार केली होती. त्याद्वारे जनजागृती केली होती. याचदरम्यान, फसवणूक, सोनसाखळी चोरीसारखे गुन्हे, प्रतिबंधात्मक गुन्हे (संशयित हालचाली)आणि वाहतूक समस्यांवर प्रामुख्याने आता लक्ष केंद्रित करून जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.या मोहिमेच्या सुरुवातीला आयुक्तालयाच्या हद्दीतील ठाणे शहर, वागळे इस्टेट, कल्याण,भिवंडी, आणि उल्हासनगर या पाच परिमंडळांत म.गांधींचेछायाचित्र आणि सबको सन्मती दे भगवान... अशा मजकुराचे फलक लावले आहेत. दुसऱ्या टप्प्यात ठाणेकर असलेल्या १० मराठी कलाकार मंडळांच्या माध्यमातून काही शॉर्ट फिल्म्स तयार केल्या आहेत. ही मंडळी गुन्हे घडण्यापूर्वी तसेच काही संशयित हालचालींवर आणि शहराला भेडसावणाऱ्या वाहतूक समस्यांबाबत कशी खबरदारी घ्यावी, याबाबत हे जनप्रबोधन आहे. या जनजागृतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून हे उद्घाटन होईपर्यंत नागरिकांना वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिका बजावावी लागणार आहे. ठाणेकर १० मराठी कलाकारांच्या मदतीने शॉर्ट फिल्म्स तयार केल्या आहेत. याचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर त्या सिनेमागृहात आणि स्थानिक केबलवर प्रसारित केल्या जातील. यातून ‘क ाळजी करण्यापेक्षा काळजी घ्या’ हाच या जनजागृती मोहिमेमागील प्रमुख उद्देश आहे.- व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, सहपोलीस आयुक्त, ठाणे शहर