लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी करत ४ जून रोजी पुकारलेल्या मल्हार क्रांती मोर्चाला शुक्रवारी स्थगिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या चिघळलेल्या आंदोलनामुळे नवी मुंबईत निघणारा मोर्चा पावसाळी अधिवेशनादरम्यान काढण्यात येईल, अशी माहिती मोर्चाच्या समन्वयकांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान, धनगर आरक्षण संघर्ष समितीने ३१ मे रोजी पंतप्रधान कार्यालयाला धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे निवेदन दिले होते, अशी माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली. त्याची दखल घेत, पंतप्रधान कार्यालयाने राज्य सरकारला तोडगा काढण्याचे आदेश दिले. तूर्तास शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने तत्काळ हाताळावेत. धनगर आरक्षणाचाही प्रश्नही मार्गी लावावा. पावसाळी अधिवेशनापर्यंत दोन्ही प्रश्नांवर भूमिका घेतली नाही, तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
धनगर आरक्षणाचा निर्णय लवकर घ्या - संघर्ष समिती
By admin | Published: June 03, 2017 4:10 AM