‘चित्रपटगृहात खुशाल न्या घरचे खाद्यपदार्थ!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:41 AM2017-12-11T04:41:22+5:302017-12-11T04:41:34+5:30

चित्रपटगृहामध्ये घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाहीच. खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव करणे कायद्याने गैर आहे, असे राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले.

 'Take food at home and eat food!' | ‘चित्रपटगृहात खुशाल न्या घरचे खाद्यपदार्थ!’

‘चित्रपटगृहात खुशाल न्या घरचे खाद्यपदार्थ!’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चित्रपटगृहामध्ये घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाहीच. खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव करणे कायद्याने गैर आहे, असे राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले. यासंदर्भात तक्रारी असल्यास त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
देशपांडे म्हणाले की, आता ग्राहकांनी भांडकुदळ होण्याची गरज आहे. सिनेमागृहामध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्याबाबत बंदी नाहीच. चित्रपटगृहातील द्वारपालाने मागणी केल्यास त्यांना बाटलीतील पाणी किंवा घरून नेलेल्या अन्नपदार्थांबाबत खात्री करून दिल्यास कोणतीही अडचण नाही.

चित्रपटगृहात फलक लावणार
चित्रपटगृहात प्रेक्षकांनी स्वत: जवळच्या पाण्याच्या बाटल्या, घरगुती खाद्यपदार्थ नेण्यास प्रतिबंध करता येणार नाही. यासंदर्भातील सूचनाफलक येत्या १५ दिवसांत प्रत्येक चित्रपटगृहाच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत, असेही देशपांडे यांनी सांगितले.

संबंधित विभाग आणि दूरध्वनी
ग्राहक संरक्षण विभाग ०२४०२३३४३१० (औरंगाबाद)
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालय दूरध्वनी (मुंबई)
२२०२५३०० / २२०२४६८८ / २२०२७०७५ / २२०२५२७७

Web Title:  'Take food at home and eat food!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.