लोकल बिघाडांचा आढावा घेणार

By admin | Published: June 3, 2016 03:15 AM2016-06-03T03:15:53+5:302016-06-03T03:15:53+5:30

गेल्या काही दिवसांत मुंबईच्या तिन्ही उपनगरीय मार्गांवरील लोकल सेवा अनेक कारणांनी विस्कळीत होत आहे. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत असल्याने उपनगरीय लोकल रुळावर येणार कधी

Take a look at the local fiasco | लोकल बिघाडांचा आढावा घेणार

लोकल बिघाडांचा आढावा घेणार

Next

मुंबई : गेल्या काही दिवसांत मुंबईच्या तिन्ही उपनगरीय मार्गांवरील लोकल सेवा अनेक कारणांनी विस्कळीत होत आहे. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत असल्याने उपनगरीय लोकल रुळावर येणार कधी, असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर त्याची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बिघाडांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत थेट एका रेल्वे बोर्ड सदस्यालाच धाडले. बिघाडाची कारणे आणि अन्य माहितीचा एक अहवाल रेल्वेमंत्री प्रभू यांना लवकरच या सदस्याकडून सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर विशेष मोहीम घेण्याबरोबरच असुरक्षित ठिकाणांचा आढावा घेण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे बोर्ड सदस्याकडून देण्यात आले आहेत.
सिग्नलमध्ये बिघाड, रुळाला तडा, ओव्हरहेड आणि लोकलच्या पेन्टाग्राफमध्ये समस्या, रुळावरून ट्रेन घसरणे इत्यादी कारणांमुळे पश्चिम, मध्य रेल्वेची मेन लाइन आणि हार्बर सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी तर अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असून त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचा आढावा मुंबई रेल्वे बोर्ड सदस्य गणेश पिल्लई (टूरिझम, कॅटरिंग, पायाभूत सुविधा) यांच्याकडून घेण्यात आला. त्यामध्ये नुकत्याच घडलेल्या तीन घटनांची त्यांनी गांभीर्याने दखल घेतली. पश्चिम रेल्वेवर लोअर परेल येथे रुळावरून ट्रेनचा घसरलेला एक डबा, मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील विक्रोळी येथे ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने सिग्नल यंत्रणेत निर्माण झालेली समस्या आणि हार्बरच्या वडाळा येथील रावळी जंक्शनजवळील सिग्नल यंत्रणेला लागलेली आग या घटनांची माहिती त्यांनी घेतली. एकूणच घडणाऱ्या घटनांसंदर्भात माहिती देताना पिल्लई यांनी सांगितले की, रेल्वेमंत्र्यांकडून उपनगरीय मार्गावर होणाऱ्या बिघाडाची दखल घेतली आणि त्याचा आढावा घेण्यासाठी मला पाठविले आहे. यासंदर्भात एक अहवाल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना सादर केला जाईल. लोकल सेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी योग्य त्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
रेल्वेच्या मालमत्तेला आणि पायाभूत सुविधेला रेल्वे मार्गांवरील काही ठिकाणांमुळे नुकसान पोहोचत आहे. अशा असुरक्षित ठिकाणांची माहितीही घेतली जात आहे. यात खासकरून रुळांजवळ असणाऱ्या झोपडपट्ट्यांचा समावेश असून रेल्वे सुरक्षा दलाकडून या ठिकाणी जनजागृती मोहीम घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)च्बुधवारी संध्याकाळी हार्बरच्या वडाळ्याजवळील रावळी जंक्शन येथे सिग्नलच्या केबलला आग लागली. ही आग लागल्यामुळे अप मार्गावरील तीन सिग्नल पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे सीएसटीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि त्याचा परिणाम सीएसटीहून सुटणाऱ्या लोकल गाड्यांवरही झाला.
च्या घटनेमुळे हार्बरला मोठा फटका बसला. जवळपास ७३ लोकल रद्द होतानाच ९३ लोकलच्या वेळापत्रकात बिघाड झाला. मध्य रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतानाच केबल जाळणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.
च्या घटनेची सविस्तर माहिती रेल्वे बोर्ड सदस्यांकडून घेण्यात आली. रावळी जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या असून येथील रहिवासी १९९0 पूर्वीचे आहेत. राज्य सरकारचे २000 पर्यंतच्या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करण्याचे आदेश असल्याचे या वेळी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले. लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न
मुंबईत दिवसेंदिवस गर्दी वाढत असून त्याचा परिणाम लोकलवर होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न होत असल्याचे या वेळी पिल्लई यांनी सांगितले.

Web Title: Take a look at the local fiasco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.