Join us

नवी मुंबईतून वर्षभरात टेकऑफ; फडणवीसांचे विधानसभेत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 7:02 AM

उपमुख्यमंत्री फडणवीस : राज्यांतर्गत विमानसेवेचा प्रश्न सुटणार

लोकमत न्यूज नेटवर्क   मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आहे. हे विमानतळ कार्यरत झाल्यानंतर महाराष्ट्रांतर्गत विमानसेवेचा प्रश्न सुटलेला असेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विधानसभेत सांगितले. 

सर्व विमानतळांच्या  विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाईल. नोडल एजन्सीची स्थापना करण्यात येणार असून, सर्वसमावेशक आराखडा तयार करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नांदेड विमानतळावर नाइट लँडिंगची सुविधा तसेच कऱ्हाड येथेही विमानतळ उभारण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अमित देशमुख यांनी लातूर विमानतळ तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

हेलिपोर्टची चाचपणीराज्यातील प्रत्येक तालुक्यात एक हेलिपॅड उभारण्याच्या प्रस्तावाचे पुढे काय झाले, अशी विचारणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यावर एक समिती बनवली आहे. प्रत्येक तालुक्यात जागादेखील निश्चित झाल्या असून त्या तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत का, याची तपासणी समिती करेल असे फडणवीस म्हणाले.

शिर्डीत टर्मिनल बिल्डिंगशिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर साडेसहाशे कोटी रुपये खर्चून नवीन टर्मिनल बिल्डिंग बांधण्यात येईल. सध्या तिथे नाइट लँडिंगची कायमस्वरूपी परवानगी नाही. ती मिळविण्यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी बाळासाहेब थोरात यांच्या प्रश्नावर दिले.

टॅग्स :नवी मुंबईदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र