‘म्हाडा’ची जमीन ताब्यात घेत त्याला 'कंपाऊंड वॉल' घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:06 AM2021-03-20T04:06:26+5:302021-03-20T04:06:26+5:30

गौरी टेंबकर-कलगुटकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: 'सरकारने म्हाडाच्या मालकीच्या सर्व जागा ताब्यात घेऊन त्याभोवती कंपाऊंड वॉल घालावी, जेणेकरून त्याचा ...

Take possession of MHADA's land and put a 'compound wall' on it | ‘म्हाडा’ची जमीन ताब्यात घेत त्याला 'कंपाऊंड वॉल' घाला

‘म्हाडा’ची जमीन ताब्यात घेत त्याला 'कंपाऊंड वॉल' घाला

Next

गौरी टेंबकर-कलगुटकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: 'सरकारने म्हाडाच्या मालकीच्या सर्व जागा ताब्यात घेऊन त्याभोवती कंपाऊंड वॉल घालावी, जेणेकरून त्याचा दुरुपयोग होणार नाही, अशी मागणी येथील ‘म्हाडा’चे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर सरकारकडे करणार आहेत. शुक्रवारी मालवणीतील गायकवाडनगरच्या संक्रमण शिबिराला भेट दिल्यानंतर त्यांनी 'लोकमत'शी बोलताना ही माहिती दिली.

घोसाळकर यांनी शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गायकवाडनगर येथील संक्रमण शिबिरांना भेट दिली. त्यांच्यासोबत म्हाडा आणि पालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. त्यावेळी ‘म्हाडा’च्या जमिनीवर अनधिकृतपणे लग्नाचे मंडप उभारून सुरू असलेल्या धंद्यावर सरप्राईज व्हिजिट देत कारवाई करा व भूखंड मोकळे करा, असे निर्देश घोसाळकर यानी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पोलीस लाईनच्या पडक्या चाळींना भेट देऊन तेथील घाणीचे साम्राज्य हटवत स्वच्छ वातावरण निर्माण करण्याचेही ते म्हणाले. तसेच म्हाडाच्या एनओसीचे कारण देऊन स्थानिक महापालिका अधिकाऱ्यांनी नगरसेवक निधीतून होणारी जी सार्वजनिक कामे रखडून ठेवली आहेत, तीदेखील मार्गी लावण्यास त्यांनी सांगितले.

पोलीस लाईनच्या पडक्या चाळींमधील घाणीचे साम्राज्य हटवून स्वच्छ वातावरण निर्मिती करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. ‘म्हाडा’चे जेवढे आरक्षित व अविकसित भूखंड आहेत, त्या सर्व भूखंडांवर कुंपण लावून ते सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्याबाबत सरकारकडे निधीची मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गेल्या दोन दशकांपासून पडीक असलेल्या महापालिकेच्या गुजराती शाळेला भेट देऊन त्याबाबत माहिती घेत आवश्यक ती पावले उचलण्याबाबत अधिकाऱ्याना मार्गदर्शन केले.

त्यावेळी त्या ठिकाणी प्रभाग समिती अध्यक्षा संगीता संजय सुतार, विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, गायकवाडनगर ओनर्स ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष फिरोज शेख तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

... तरच म्हाडा भूखंडाचा गैरवापर थांबेल

'मालवणी विभागात ‘म्हाडा’ची १३७ एकरांहून अधिक जागा असून त्यात जागतिक बँक प्रकल्प, पोलीस वसाहती आहेत. मात्र अजूनही लोकांना आवश्यक त्या सोयीसुविधा नाहीत. परिणामी सामान्य माणसाला म्हाडा आणि पालिकेकडे हेलपाटे घालावे लागतात. त्यामुळे ‘म्हाडा’च्या सर्व जागांवर कंपाऊंड वॉल घालत त्यावर निरीक्षण अधिकारी नेमणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा भूखंडावर होणारे गैरप्रकार टाळता येऊन त्यांचा गैरवापरही थांबेल.

( विनोद घोसाळकर - सभापती, म्हाडा-इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ)

Web Title: Take possession of MHADA's land and put a 'compound wall' on it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.