- गौरी टेंबकरमुंबई : पाचशेहून अधिक महिला पारंपरिक वेषात रुईया हायस्कूलच्या आवारात आनंदात वावरत होत्या. एकमेकींना हळदीकुंकू लावत आणि हातात तीळगूळ आणि वाण ठेवत ‘तीळगूळ घ्या आणि गोडगोड बोला’चा संदेश देणे सुरू होते. निमित्त होते ते अर्थात हळदीकुंकू आणि प्रजासत्ताक दिनाचे. विमानतळाजवळील बामनवाडा झोपडपट्टी ते विलेपार्लेतील उच्चभ्रू वस्तीतील महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. शिक्षित आणि अशिक्षित या दोन्ही वर्गांतील महिलांसह विलेपार्ले पोलिसांनीही यात भाग घेऊन २६ जानेवारी साजरा केला. त्यानंतर महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने काही कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आले. लहान-मोठ्या वादातून उद्भवणाºया मोठ्या समस्यांवर कशा प्रकारे मात करता येईल याबाबत तीळगूळ वाटून जनजागृती करण्यात आली.‘माझी सासू माझा छळ करते ’पासून ‘माझ्या भावाने माझे पैसे चोरले’सारख्या तक्रारी इथे रुटीन बनल्या आहेत. मात्र या तक्रारींमागे ९० टक्के वाद हे संपत्तीशी संबंधित असतात. त्यामुळे कोणावरही खोटा गुन्हा दाखल होणार नाही याची काळजी घेत रोजचे तंटे मिटविण्याचा प्रयत्न विलेपार्ले पोलीस करतात. मध्यंतरी शर्मा नावाचा एक इसम सख्ख्या भावाने पैसे चोरल्याची तक्रार दाखल करण्यासाठी आला. तेव्हा पोलिसांनी त्याच्या भावाला बोलावून घेतले. चौकशीदरम्यान तपास अधिकाºयांना समजले की एकत्र राहणाºया शर्माच्या भावाने घराचे बांधकाम केले. त्या वेळी शर्मा त्याला आर्थिक मदत करू शकला नव्हता. त्यामुळे भाऊ आता आपले घर लाटेल याची भीती त्याला सतावत होती, त्यातून भावावर खोटी तक्रार करण्याची युक्ती त्याला सुचली. ही बाब त्याने कबूलही केली. तेव्हा निव्वळ गैरसमजामुळे एखाद्याचे उद्ध्वस्त होणारे आयुष्य आणि भावंडांची ताटातूट पोलिसांमुळे वाचली.सुसंवादाने तोडगा‘आमच्याकडे इतर सर्व पोलीस ठाण्यांप्रमाणे लहान-मोठे गुन्हे घडत असतात. मात्र सर्वाधिक तक्रारी कौटुंबिक वादाच्याच असतात. त्यामुळे सुसंवादानेच यावर तोडगा काढण्याचे आव्हान आमच्यासमोर असते.- लक्ष्मण चव्हाण,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विलेपार्ले पोलीस ठाणे‘पोलीस दीदी’चे धडे ठरताहेत उपयुक्त..च्लहान मुलांना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’बाबत माहिती देणाºया मुंबई पोलिसांच्या ‘पोलीस दीदी’ या उपक्रमादरम्यान विलेपार्ले पोलिसांकडून दिले जाणारे लैंगिक शिक्षणाचे धडे अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.च्त्यामुळे या उपक्रमाच्या सुरुवातीलाच हे धडे झाल्यानंतर एका शाळेतील विद्यार्थिनींनी त्यांच्यासोबत अश्लील चाळे करणाºया शेजाºयाबाबत पालकांना सांगितले; आणि शेजाºयाला बेड्या ठोकण्यात आल्या.‘फिजिओथेरपिस्ट’ बलात्कार, हत्या प्रकरण‘२०१६मध्ये अख्ख्या मुंबईला हादरवून टाकणाºया फिजिओथेरपिस्ट श्रद्धा पांचाळ बलात्कार, हत्या प्रकरणाचा गुंता सोडवत आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे क्रेडिट विलेपार्ले पोलिसांना आहे. तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी पांचाळचा मारेकरी देबाशीष धर याचा गाशा गुंडाळला. कोणताही ‘क्लू’ नसताना पांचाळच्या घरी सापडलेल्या एका ‘हेअरब्रश’च्या मदतीने पोलीस निरीक्षक व्ही. निंबाळकर आणि पथकाने ही ‘रेअर केस’ उघड केली होते.
तीळगूळ घ्या आणि गोड बोलून वाद संपवा..! ‘तू-तू, मैं-मैं’वर समुपदेशनाचा उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 7:14 AM