डेंग्यूसाठी घ्या विशेष काळजी!

By admin | Published: July 11, 2016 05:27 AM2016-07-11T05:27:06+5:302016-07-11T05:27:06+5:30

पावसाळा सुरू झाल्यावर साचलेल्या पाण्यात होणाऱ्या डासांमुळे मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात होते.

Take special care for dengue! | डेंग्यूसाठी घ्या विशेष काळजी!

डेंग्यूसाठी घ्या विशेष काळजी!

Next


मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर साचलेल्या पाण्यात होणाऱ्या डासांमुळे मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात होते. पावसाळा संपल्यावरही आॅक्टोबर महिन्यापर्यंत सर्वसाधारणपणे डेंग्यूचे रुग्ण आढळून येतात, पण यंदा पावसाळ््याआधी म्हणजे मे महिन्यात मुंबईत १२९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. हा ट्रेंड नवीन असल्याचे मत हिरानंदानी रुग्णालयाच्या संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. नीरज तुलारा यांनी मांडले.
पावसाळ््यात होणाऱ्या साथीच्या आजारात मुंबईत सामान्यत: डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळून येतात. योग्य वेळी निदान झाल्यावर औषधोपचार पूर्ण केल्यास डेंग्यूचे आणि मलेरियाचे रुग्ण पूर्णत: बरे होतात, पण यंदा मुंबईत पावसाळा लांबला होता. तरीही मे आणि जून महिन्यांत जवळपास २०० डेंग्यूचे रुग्ण उपचारासाठी आले होते. गेल्या चार ते पाच वर्षांचा विचार केल्यास, मे-जून महिन्यात डेंग्यूचे प्रमाण अत्यल्प असते. पावसाळ््यापूर्वी फक्त २० ते ३० रुग्ण डेंग्यूचे आढळून येतात. यंदा हा नवीन ट्रेंड पाहायला मिळाला आहे. यापैकी १० टक्के रुग्णांच्या डेंग्यूमुळे प्लेटलेट्स २० हजारांवर आल्या होत्या. डेंग्यूचे डास हे २० ते २५ अंश सेल्सिअस तापमानात जगू शकतात, पण त्यापेक्षा अधिक तापमान असल्यास ते जगू शकत नाहीत. त्यामुळे पावसाळ््यात डेंग्यूला रोखण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. तुलारा यांनी सांगितले.
अधिक तापमानात डेंग्यूचे डास जगू शकत नाहीत, पण यंदा तापमान जास्त होतेच, पण आर्द्रताही जास्त होती. त्यामुळे डेंग्यूचे काही प्रमाणात रुग्ण मे आणि जून महिन्यातही आढळून आले आहेत. आर्द्रता जास्त असल्यास डासांपासून होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे आता विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
डेंग्यू लक्षणे
ताप, स्नायू दुखणे, सांधेदुखी, डोकेदुखी, अन्नावरची इच्छा उडणे, पुरळ उठणे
कुठे साचून राहते पाणी?
छपरावर टाकलेली ताडपत्री
अडगळीच्या वस्तू, टायर
एसी डक्ट
फ्रीजचे टब
गच्ची
झाडांखाली ठेवलेल्या ताटल्या

Web Title: Take special care for dengue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.