थुंकी चाटायला लावणाऱ्या जात पंचावर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:07 AM2021-05-13T04:07:34+5:302021-05-13T04:07:34+5:30

थुंकी चाटायला लावणाऱ्या जात पंचांवर कठोर कारवाई करा उपसभापती नीलम गोऱ्हे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...

Take stern action against the caste punch that makes you spit | थुंकी चाटायला लावणाऱ्या जात पंचावर कठोर कारवाई करा

थुंकी चाटायला लावणाऱ्या जात पंचावर कठोर कारवाई करा

Next

थुंकी चाटायला लावणाऱ्या जात पंचांवर कठोर कारवाई करा

उपसभापती नीलम गोऱ्हे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : न्यायालयातून रीतसर घेतलेला घटस्फोट धुडकावून लावत जातपंचायतीने महिलेचा पुनर्विवाह अमान्य केला. शिवाय, शिक्षा म्हणून पंचांची थुंकी चाटण्याची विकृत शिक्षा महिलेला दिली. अकोला जिल्ह्यातील वडगाव येथील या संतापजनक घटनेतील सर्व जात पंचांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली आहे.

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात मु. वडगाव, पो. पिंजर येथे हा किळसवाणा प्रकार घडला आहे. पीडित महिलेने पतीच्या जाचाला कंटाळून २०१५ मध्ये न्यायालयातून रीतसर घटस्फ़ोट घेतला. मात्र, पीडित महिलेने न्यायालयात जाणे तिच्या नाथजोगी जातपंचायतच्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फ़ोट धुडकावून लावला. शिवाय, पीडित महिलेने २०१९ मध्ये घटस्फोटित व्यक्तीशी केलेला पुनर्विवाह अमान्य करत जातपंचायतने महिलेलाच एक लाख रुपयांचा दंड केला. न्यायनिवाड्याच्या नावाखाली या समाजाचे महाराष्ट्रातील पंच एकत्र आले, दारू-मटणावर ताव मारला आणि पीडित परिवाराला जात बहिष्कृत केले. पीडित महिलेने पहिल्या नवऱ्यासोबत राहावे, असा पंचांनी हेका कायम ठेवला. तसेच पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे व त्या महिलेने ते चाटायचे अशी विकृत शिक्षा ९ एप्रिल २०२१ रोजी पीडित महिलेला देऊन विकृतीचे दर्शन घडविले. या घटनेतील पीडित महिला सध्या जातपंचायतीच्या दबावामुळे माहेरीच आहे. या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी गोऱ्हे यांनी केली आहे.

जातपंचायतीच्या घटना सातत्याने घडत असून जातपंचायत कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे गोऱ्हे यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सर्व जातपंचायतीच्या पंचांची माहिती गोळा करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Take stern action against the caste punch that makes you spit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.