वांद्रे-वरळी सीलिंकवर अपघात प्रकरणी कंत्राटदारावर कडक कारवाई करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: October 5, 2022 09:21 PM2022-10-05T21:21:56+5:302022-10-05T21:22:18+5:30

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष चेतन कदम यांचा मृत्यू

Take strict action against the contractor in case of accident on Bandra-Worli Sealink; NCP demand | वांद्रे-वरळी सीलिंकवर अपघात प्रकरणी कंत्राटदारावर कडक कारवाई करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

वांद्रे-वरळी सीलिंकवर अपघात प्रकरणी कंत्राटदारावर कडक कारवाई करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Next

मुंबई :  वांद्रे-वरळी सीलिंकवर चार वाहने आणि रुग्णवाहिका यांच्यात धडक दिल्याने आज पहाटे साडे तीनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला झाला. या दुर्घटनेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष चेतन कदम यांचा जागीच मृत्यू झाला असून, पक्षातून याबाबत तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्घटनास्थळी पाहणी केली. सीलिंकवर काही मिनिटांपूर्वीच झालेल्या या अपघातातील जखमींना ॲम्बुलन्सद्वारे उपचारार्थ नेत असतांना मागून येणाऱ्या एका भरधाव कारने या कर्मचारी व उपस्थितितांना धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केला. त्यामुळे  येथे एखादा अपघात घडल्यास कोणतीही उपाययोजना आणि एक्झिटपॉईंट व सुरक्षिततेच्या उपायांची अंमलबजावणी या सीलिंकवरील टोल वसुलीचे आणि मेंटेनन्सचे कंत्राट दिलेल्या कंपनीने केली नाही असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या कंपनीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Take strict action against the contractor in case of accident on Bandra-Worli Sealink; NCP demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात