Join us

महिलांवर हात उगारणाऱ्या उद्दाम सरकारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा- आ. डॉ. नीलम गो-हे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 12:12 AM

मुंबईः पुणे जिल्ह्यात दहशतवादविरोधी पथकात (एटीएस) काम करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी आणि त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी शिवसेना आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे केली आहे.

मुंबईः पुणे जिल्ह्यात दहशतवादविरोधी पथकात (एटीएस) काम करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी आणि त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी शिवसेना आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे केली आहे. या उपनिरीक्षकाने त्याच्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेला मारहाण व विनयभंग केल्याची घटना 29 ऑक्टोबर 2017 रोजी पुणे शहरात शुक्रवार पेठेत घडली आहे.सदर महिला व अधिकारी एकाच सोसायटी मध्ये राहतात. 29 अॉक्टोबर 2017 रोजी सोसायटीमध्ये पत्र्याचे शेड टाकून अनधिकृत बांधकाम केल्याबाबत या महिलेने सदर अधिका-यास विचारणा केली होती. यावर राग येऊन या अधिका-याने  सदर महिलेला मारहाण करुन तिचे केस ओढून तिचा विनयभंग केल्याचे नमूद केले आहे. याबाबत अशा प्रकारचे गैरवर्तन एटीएसच्या पोलीस उपनिरिक्षकाकडून होणे लज्जास्पद असल्याचे नमूद करून या घटनेची सखोल चौकशी करून सदर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन राज्याचे पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख, पुण्याचे पोलीस आयुक्त यांना देखील देण्यात आले आहे. त्यासोबत सदर पीडित महिलेकडून आलेला व्हिडीओ, कागदपत्रे व फोटो या अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. आ. डॉ. गोऱ्हे यांनी याबाबतची माहिती पोलीस महासंचालकांना अवगत केली. त्यावर त्यांनी त्वरित प्रतिसाद देत या विषयात संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले आहे. याबद्दल आ. डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :शिवसेना