दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:18 AM2018-11-25T01:18:46+5:302018-11-25T01:19:00+5:30
सीजीएसआय : कायद्याची अंमलबजावणी हवी
मुंबई : दुधात भेसळ करणाºयांवर कडक कारवाई होण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. याबाबत विधानसभेत दूध भेसळ करणाºयांना दंड आणि आजन्म कारावासाच्या शिक्षेची मंजुरी झाली आहे. फौजदारी कायद्याच्या १९७३ मधील पाच कलमांमध्ये त्यासाठी दुरुस्ती केली आहे. याबाबत कन्झ्युमर गायडन्स सोसायटीच्या (सीजीएसआय) वतीने कायद्यात दुरुस्ती झाल्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र कायद्याची अंमलबजावणी होऊन कारवाई होणे आवश्यक असल्याचे सीजीएसआय संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सीजीएसआयचे अध्यक्ष सीताराम दीक्षित यांनी सांगितले की, ग्राहकांकडे दूध अनेक मार्गांनी पोहचले जाते. खुल्या आणि पॅकिंगमध्ये दुधाची विक्री केली जाते. खुल्या दुधावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने पॅकिंग दुधापेक्षा खुल्या दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळयुक्त दुधामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. ग्राहकांनीदेखील दूध खरेदी करताना जबाबदारीने वागले पाहिजे. ब्रँडेड कंपनीचे दूध खरेदी करणे, त्यावरील एफएसएसआय मानक पाहणे. ग्राहकांनी स्वत: पुढाकार घेऊन जागृती करणे आवश्यक असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
सीजीएसआयचे सरचिटणीस डॉ. मनोहर कामत यांनी सांगितले की, दुधात भेसळ केल्यास दंड आणि आजन्म कारावास होणार असल्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र कायदे बनतात, त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. भेसळयुक्त दूध विक्री करणाºया छोट्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. मात्र यात मोठे भेसळयुक्त दूध विक्री करणारे माफिया मोकाट सुटले आहेत. अशा माफियांवर कारवाई केली पाहिजे. भेसळयुक्त खाद्यपदार्थ किंवा भेसळयुक्त दूध विक्री करणाºयांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायदान प्रक्रिया जलदगतीने होईल, असे कामत यांनी सांगितले.