हिंदुत्वाला हाताशी घेऊन भाजप शिवसेनेला कोंडीत पकडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 01:45 AM2020-11-21T01:45:45+5:302020-11-21T01:46:26+5:30

महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाचा प्रारंभ

Taking Hindutva in hand, BJP will trap Shiv Sena | हिंदुत्वाला हाताशी घेऊन भाजप शिवसेनेला कोंडीत पकडणार

हिंदुत्वाला हाताशी घेऊन भाजप शिवसेनेला कोंडीत पकडणार

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्वबळावर मुंबई महापालिकेची सत्ता संपादन करण्याचा निर्धार भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नवनियुक्त कार्यकारणीतील भाषणातून फडणवीस यांनी मुंबईतील आगामी राजकारणाची दिशाच एकप्रकारे स्पष्ट केली आहे. आजवरचा पालिकेच्या भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणायचे, मुंबईच्या विकासाबाबतचे स्वत:चे व्हिजन मांडायचे आणि हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेला कोंडीत पकडायचे या त्रिसुत्रीवरच मुंबई पालिकेचा रणसंग्राम फिरविण्याचा भाजपचा मानस कार्यकारिणीच्या बैठकीतून समोर आला आहे.


पाच वर्षांपुर्वीच्या पालिका निवडणुकाही शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे लढल्या होत्या. तेंव्हाच्या तुंबळ लढतीत शिवसेनेला ८४ तर भाजप ८२ जागा मिळाल्या होत्या. मात्र, राज्यातील युतीचे समीकरण स्थिर ठेवण्यासाठी भाजपने  पालिकेत सत्ताही नको आणि विरोधी पक्षनेते पदही अशी विचित्र भूमिका स्वीकारली. आता, महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर मात्र भाजपसमोर युतीची अडचण नाही. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता खेचण्याचा निर्धार भाजपने व्यक्त केला आहे. मात्र, सध्या विरोधी पक्षात बसलेल्या भाजपला मागच्या पालिका निवडणुकीतील चमत्काराची पुनरावृत्ती करता येईल का, असा प्रश्न आहे.


शिवसेना राज्यातील सत्तेचा वापर करत मुंबईतील सत्ता राखण्याचे पूरेपूर प्रयत्न करणार याची जाणीव भाजपला आहे. हिंदुत्व, विकास आणि पालिकेचा आजवरचा कारभार गेच भाजपचे धोरण दिसत आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगात हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. त्यात आगामी काळात वाढ होईल. सर्वात श्रीमंत महापालिका नागरी समस्या सोडविण्यात कमी पडते. पावसाळयातील कोंडीपासून पालिकेतील भ्रष्टाचारापर्यंत असंख्य मुद्दे विरोधासाठी आयते कोलित असणार आहेत. त्यासाठी किरीट सोमैय्या, राम कदम आणि ज्यांच्याकडे प्रभारी पद सोपविण्यात आले त्या अतुल भातखळकर अशा नेत्यांची कुमक तयारच आहे. शिवाय, मुंबईच्या विकासाबाबत विविध प्रकल्पांचा स्वत:चा आराखडा सतत लोकांसमोर मांडायचे, शिवसेना त्यात कमी पडत असल्याचे दाखवून द्यायचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. 

प्रशासन ठरले आहे अपयशी
महाविकास आघाडीच्या प्रयोगात हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. सर्वात श्रीमंत महापालिका नागरी समस्या सोडविण्यात कमी पडते. पावसाळयातील कोंडीपासून पालिकेतील भ्रष्टाचारापर्यंत असंख्य मुद्दे विरोधासाठी आयते कोलित असणार आहेत.

Web Title: Taking Hindutva in hand, BJP will trap Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.