आधी मन घेई हाती, तोचि गणराज गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:10 AM2021-09-10T04:10:28+5:302021-09-10T04:10:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जीवनाचे केंद्र म्हणजे मन. जीवनाचा रिमोट कंट्रोल हा मनाच्या हातात असतो. सुख, समाधान, यश, ...

Before taking the mind, Tochi Ganraj Ganpati | आधी मन घेई हाती, तोचि गणराज गणपती

आधी मन घेई हाती, तोचि गणराज गणपती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जीवनाचे केंद्र म्हणजे मन. जीवनाचा रिमोट कंट्रोल हा मनाच्या हातात असतो. सुख, समाधान, यश, इच्छा, एवढेच काय तर मोक्ष मिळवून देण्याची तसेच ईश्वरापर्यंत नेण्याची ताकदही मनात असते. त्यामुळे मनाला प्रसन्न केले, जे पाहिजे ते दिले तर ते सुखी आणि पर्यायाने आपण सुखी हे समजावून देताना जीवनविद्येचे आजीव विश्वस्त प्रल्हाद दादा पै यांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, आधी मन घेई हाती, तोचि गणराज गणपती’ या अभंगांचे दाखले दिले.

अमेरिकेतील आमी परिवार म्हणजेच अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स परिवारातर्फे आयोजित केलेल्या ‘फेसबुक लाइव्ह ग्लोबल टॉक शो’मध्ये ‘मनावर घ्या’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रल्हाद दादा पै यांना निमंत्रित करण्यात आले होते. या टॉक शोमध्ये पै यांनी मन या अत्यंत अवघड विषयाला हात घालताना सद्गुरू वामनराव पै यांनी मनावर मांडलेल्या सिद्धान्ताचे दाखले देत अत्यंत सोप्या भाषेत पण सखोल मार्गदर्शन करीत ऐकणाऱ्यांना मंत्रमुग्ध केले.

‘मनःस्थिती बदला, परिस्थिती बदलेल’ या जीवनविद्येच्या सिद्धान्ताप्रमाणे जीवन जगताना, प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख मेळ घालून संसार करण्याची गुरुकिल्ली श्रोत्यांच्या हातात देत प्रल्हाद पै यांनी प्रपंच हा परमार्थाचाच पाया आहे हे आवर्जून नमूद केले. जिथे यश असते, तिथे सुख असतेच असे नाही याचे दाखले देत प्रल्हाद पै यांनी यशाला परमार्थाची जोड दिली तर जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी आणि स्ट्रेस फ्री होईल, असे सांगितले.

दुसऱ्यांविषयी चांगला विचार करण्यास, मन निर्मळ करण्यास, मनाचे शुद्धीकरण करण्यास, मन सावरण्यास, जोडण्यास सर्वांत उपयोगी आणि सोपा मार्ग म्हणजे जीवनविद्येची प्रार्थना, असे सांगत प्रल्हाद पै यांनी आपल्या प्रबोधनाची सांगता केली.

मी आणि मला या घातक शब्दांपासून दूर राहण्याचा सल्ला

मनात सकारात्मक विचारांपेक्षा नेहमी नकारात्मक विचारच येतात. मनाला सावरायला शिका. जसे पाण्याचा प्रवाह आपल्याला हवा तसा वळवण्यासाठी आपण पंप लावता तसेच मनाला सावरण्यासाठी ज्ञानरूपी पंपाचे सहकार्य घ्या. सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही तर देण्याची गोष्ट आहे, या सिद्धान्ताचा अचूक दाखला दिला. आपले काम प्रामाणिकपणे आणि कौशल्यबुद्धीने केलेत की त्या गोष्टीच तुमच्या मागे लागतील, असे सांगत पै यांनी मी आणि मला या घातक शब्दांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

Web Title: Before taking the mind, Tochi Ganraj Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.