मुंबई : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमराठी भाषेत होर्डिंग लावल्याने चर्चेत आलेल्या आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा नेटिझन्सने सुनावले आहे. मतदारांचे मन जिंकण्यासाठी उमेदवार वेगवेगळे मार्ग अवलंबताना दिसतात. त्याचप्रमाणे, आदित्य यांनी प्रचारासाठी अवलंबलेला ‘लुंगी पॅटर्न’ त्यांना चांगलाच भोवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटिझन्सने आदित्य यांना चांगलेच सुनावले असून, ठाकरे विरोधातील उमेदवारही याचा फायदा घेताना दिसत आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या ‘लुंगी पॅटर्न’वरून नेटकऱ्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण पुन्हा एकदा करून दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या नाºयाचा विसर पडला असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. आदित्य ठाकरेंनी दक्षिण भारतीय मतदात्यांना आकर्षित करण्यासाठी लुंगी नेसून प्रचार केला. यामुळे युवासेना आदित्य ठाकरे यांना शवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ या दिलेल्या नाºयाचा विसर पडल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात हा प्रकार घडल्याने आदित्यला विरोधकांनी लक्ष्य केले. उमेदवार जिंकून येण्यासाठी काय-काय करतात याची प्रचिती येते, अशा आशयाच्या प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांच्या या व्हिडीओला मिळत आहे, तर या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश माने हे देखील प्रचारासाठी विभाग पिंजून काढत आहेत़उमेदवार फिरताहेत मतदारांच्या दारोदारमुंबई : मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक असल्याने वडाळा मतदारसंघात उमेदवारांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर सलग सातवेळा निवडून आलेले असल्याने काँग्रेस उमेदवाराने आता वडाळ्यातील समस्या मतदारांसमोर मांडण्यास सुरुवात केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मतदारांच्या दारापर्यंत पोहोचल्यामुळे कोळंबकर यांच्या पदयात्राही वाढल्या आहेत. यामुळे वडाळ्यातील प्रचाराचे रण तापले आहे.शिवसेनेमधून काँग्रेस आणि आता भाजप असा कोळंबकर यांचा प्रवास चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या उमेदवारीबाबत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या गोटात सुरुवातीला नाराजी दिसून आली. मात्र २०१४ मध्ये कोळंबकर यांना कडवी झुंज देणारे भाजपचे मिहीर कोटेचा यांना मुलुंडमध्ये उमेदवारी मिळाल्यामुळे हा वाद शमला. तर माजी महापौर शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधवही नाराज होत्या. त्यांची संभाव्य बंडखोरी रोखण्यात शिवसेनेला यश आले. त्यामुळे कोळंबकर यांचा मार्ग सुकर झाला. कोळंबकर यांची वडाळा, दादर, नायगाव या परिसरात वोट बँक आहे. प्रचारात त्यांनी सुरुवातीपासूनच पदयात्रेवर जोर दिला आहे. कोळंबकर यांच्याबद्दलच्या नाराजीचा फायदा उठवण्याचा शिवकुमार लाड प्रयत्न करीत आहेत. रोड शोमुळे गर्दी झाली तरी मतदारांपर्यंत पोहोचता येत नाही, याची जाणीव झाल्यामुळे आता तेही पायी प्रचार करू लागले आहेत. त्याचवेळी वंचितचे लक्ष्मण पवारही पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटींवर जोर देत आहेत.या उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांनीमंगळवारी वडाळा मतदारसंघ दणाणून गेला होता.आरेचा मुद्दा ऐरणीवरमुंबई : जोगेश्वरी पूर्वमध्ये उमेदवारांकडून सुरू असलेल्या प्रचारामध्ये आरे कॉलनीचा मुद्दा उपस्थित करून मतदारांना भावनिक आवाहन केले जात आहे. जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये आरेचा काही भाग येतो़ आरेतील झाडे वाचविण्यासाठी आपण पुढाकार घेतला असून हा मुद्दा पुढे करीत काही उमेदवार मतदारांना मत देण्याचे भावनिक आवाहन करीत आहेत़ जोगेश्वरी पूर्वमध्ये सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत जरी होत असली तरी इतर पक्षांच्या उमेदवारांनीही जोरदार प्रचार करून आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार फेºयांचे आयोजन करीत जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे. तर वंचित बहुजन आघाडी, आम आदमी आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनी पायी प्रचार फेरी काढून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर जास्त भर दिला आहे. या विभागामध्ये मनसेने उमेदवार उभा केलेला नाही. यामुळे मराठी मते आपल्याकडे खेचण्यासाठी सर्व उमेदवारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.हा प्रचार शुक्रवारपर्यंतच करता येणार असल्याने आता जास्त वेळ प्रचार करण्यावर उमेदवार भर देत आहेत. यासह बाइक रॅलीही काढण्यात येत आहेत. २१ आॅक्टोबरला मतदान होणार असल्याने विभागातील मतदारांची यादी पडताळणी आणि मतदानावेळच्या इतर कामांना आता सुरुवात करण्यात आली आहे.काँग्र्रेसला जमले नाही ते मोदींनी करून दाखवलेराम नाईक यांचे प्रतिपादनमुंबई : गेली ७० वर्षे काँग्रेस सरकारला जमले नाही, ते मोदी यांच्या सरकारने करून दाखवले. कलम ३७० रद्द करून काश्मीरच्या विकासाला चालना दिली आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केले आहे़मागाठाणे आमदार आणि महायुतीचे उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या प्रकाश सुर्वे यांच्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी प्रचार सभा घेतली, त्या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहिताचे व जनकल्याणाचे निर्णय घेतल्याचे राम नाईक यांनी सांगितले़ सुर्वे यांनी केलेल्या कामांची उजळणी केली.