Join us

'तानाजी सावंत नाकाने वांगे सोलतायंत', प्रत्युत्तर देत सुषमा अंधारेंनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 2:57 PM

राज्याचे आरोग्य मंत्री आणि शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती.

मुंबई - शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या भाषणावरुन शिंदे गटाचे नेते, आमदार त्यांच्यावर पलटवार करताना दिसून येतात. आमदार संजय शिरसाट यांनी यापूर्वी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. त्याप्रकरणात छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी शिरसाट यांना क्लीन चीट दिली आहे. त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल केल आहे. फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून नाही, तर वकिल म्हणून माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे त्यांनी म्हटले. तसेच, यावेळी, तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत त्यांना इशाराही दिला.   राज्याचे आरोग्य मंत्री आणि शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने एका महिलेला ठाकरे गटाला भाडेतत्वावर दिलं आहे, असा टोला तानाजी सावंत यांनी लगावला होता. आता, तानाजी सावंत यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. तसेच, हा ट्रेलर असून तुमच्यासाठी स्पेशल एपिसोड घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

माझा आणि राष्ट्रवादीचा काहीही संबंध नव्हता, मी राष्ट्रवादीची प्राथमिक सदस्यही नव्हते. पण, तानाजी सावंत म्हणाले मी राष्ट्रवादीकडून भाडेतत्त्वावर शिवसेनेत आले. जे तानाजी सावंत नाकाने वागे सोलतायंत, त्यांनी हे पाहाव. राहुल नार्वेकर, दीपक केसरकर, उदय सामंत, किरण पावस्कर असतील, प्रकाश सुर्वे असतील हे राष्ट्रवादीकडून आलेले पार्सल आहेत की, परग्रहावरुन आले आहेत याचं उत्तर तानाजी सावंत यांनी शोधावं, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. तसेच, सावंतजी, हा छोटा ट्रेलर आहे, मी तुमच्यासाठी स्पेशल एपिसोड घेऊन येणार आहे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंत यांना इशाराही दिला आहे. 

काय म्हणाले होते तानाजी सावंत

तानाजी सावंत एका कार्यक्रमासाठी परभणीत आले होते. तेव्हा सावंत यांनी नाव न घेता सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. ''सुषमा अंधारे यांना आमच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. तुमचा पूर्ण सर्च रिपोर्ट आमच्याकडे आहे. आमच्या रणरागिनी अजून शांत आहेत. तुमचं एकदा सगळं संपुदे, ज्यावेळेस आमच्या रणरागिनी मैदानात उतरतील, त्यावेळेस तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही'', अशा शब्दात सावंत यांनी सुषमा अंधारेंवर निशाणा साधला होता. 

टॅग्स :सुषमा अंधारेतानाजी सावंतमुंबईशिवसेना