‘रोबोवॉर’मध्ये तानाजीची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 05:56 AM2020-01-06T05:56:34+5:302020-01-06T05:56:39+5:30

खऱ्या रणांगणाबरोबर आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमधील यंदाच्या रोबोवॉर झुंजीतही तानाजीने यश मिळविले आहे.

Tanaji's bet on 'Robovor' | ‘रोबोवॉर’मध्ये तानाजीची बाजी

‘रोबोवॉर’मध्ये तानाजीची बाजी

Next

मुंबई : खऱ्या रणांगणाबरोबर आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमधील यंदाच्या रोबोवॉर झुंजीतही तानाजीने यश मिळविले आहे. जळगाव-भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा कॉलेज आॅफ इंजिनीयरिंगच्या तानाजी रोबो शूरवीराने टेकफेस्टच्या रोबोवॉरमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. ७ आंतरराष्ट्रीय रोबो आणि जवळपास ३२ रोबोंना पराभूत करत तानाजीने यश मिळविले आहे. रोबोवॉरच्या अंतिम स्पर्धेत कोरिया, ओदिशा आणि छत्तीसगडच्या रोबोेशी त्याने टक्कर देत हे विजेतेपदाचे यश मिळवले आहे.
परदेशी रोबोला पराभूत करण्याच्या उद्देशानेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील नरवीर मावळा तानाजी मालुसरे यांच्या नावावरून या टीमने तानाजी नावाचा ६० वजनी रोबो तयार केला. तानाजीचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत उतरलेल्या प्रत्येक लढतीत त्याने विजय मिळवला असून, चीन आणि रशियामध्ये झालेल्या रोबो स्पर्धेमध्ये जोरदार लढत देत विजय मिळवले आहेत. तानाजी रोबो बनवणारी टीम भुसावळमधील श्री संत गाडगेबाबा कॉलेज आॅफ इंजिनीयरिंगमधील विद्यार्थ्यांची आहे.
विद्यार्थ्यांना आपल्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी रोबोवॉर हे उत्तम व्यासपीठ टेकफेस्टमध्ये दरवर्षी आयोजित केले जाते. यात जिंकणाºया विजेत्या टीमला १ लाख रुपये रक्कम देण्यात येते. टेकफेस्टच्या पहिल्या दिवशीच्या स्पर्धेत एका स्पर्धेत, तर शनिवारी दोन लढतीत तानाजीने बाजी मारली. यामध्ये पहिल्याच दिवशी कोरियाच्या रोबोटची हार तानाजीने केली. त्या लढतीनंतर अंतिम फेरीत छत्तीसगडच्या स्वॅग या रोबोला हरवले, तर अंतिम लढतीत ओदिशाच्या वायबर रोबोवर चाल करत दमदार विजय संपादन केला. तानाजीच्या टीममध्ये इंजिनीयरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह दहावी व नोकरीव्यवसाय करणाऱ्यांचा समावेश आहे. या टीमने आतापर्यंत आठ रोबो बनवले असून, या सर्व रोबोंची नावे ही महाराष्ट्रातील महान योद्ध्यांच्या नावांवरून ठेवण्यात आली आहेत, असे अक्षय जोशी यांनी सांगितले.

Web Title: Tanaji's bet on 'Robovor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.