जत्रेतील तंबुत 'फुल और काँटे' पाहणारा 'कैलाश' अजय देवगणसोबत झळकतो तेव्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 04:20 PM2020-02-08T16:20:15+5:302020-02-08T16:23:07+5:30

मुंबई - जीवन जगत असताना एखादं रोल मॉडेल आपल्यासाठी प्रेरणादायी असते. त्या प्रेरणादायी व्यक्तीला समोर ठेऊन आपण आपली वाटचाल ...

tanhaji movie actor kailash waghmare remember of 'Phool Aur Kante' in jalana | जत्रेतील तंबुत 'फुल और काँटे' पाहणारा 'कैलाश' अजय देवगणसोबत झळकतो तेव्हा

जत्रेतील तंबुत 'फुल और काँटे' पाहणारा 'कैलाश' अजय देवगणसोबत झळकतो तेव्हा

Next

मुंबई - जीवन जगत असताना एखादं रोल मॉडेल आपल्यासाठी प्रेरणादायी असते. त्या प्रेरणादायी व्यक्तीला समोर ठेऊन आपण आपली वाटचाल करत असतो. आयुष्यातील सुरुवातीचा काळ अतिशय कठिण प्रसंगाचा अन् संघर्षाचा असतो. मात्र, संघर्षाचा काळ संपल्यानंतर सुरूवात होते आनंदाला. त्यावेळी, संघर्षाचा तोच काळ तुम्हाला अनेकांचे रोड माॉडेल बनवतो. तान्हाजी द अनसंग वॉरियर चित्रपटात चुलत्या हे पात्र निभावणाऱ्या कैलासचही कथा तशीच आहे.

अजय देवगणच्या ‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. 10 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले होते. अखेर चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटातील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या आहेत. काजोल, अजय देवगण, देवदत्त नागे, शरद केळकर आणि सैफ अली खान या महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. पण त्याचसोबत छोट्या छोट्या भूमिकेत असलेले कलाकारदेखील प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले आहेत. या चित्रपटातील चुलत्याच्या भूमिकेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. ही भूमिका एका मराठमोळ्या अभिनेत्याने साकारली आहे. या अभिनेत्याचे नाव कैलास वाघमारे असून त्याने याआधी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मूळ जालना जिल्ह्यातील राजूरचा असलेल्या कैलासने शिवाजी अंडरग्राऊंड भीम नगर मोहल्ला या नाटकात मावळ्याची भूमिका साकारली होती, याच नाटकाने त्याच्या करियरला एक वळण दिले. 

गावकडच्या एका पोराचा हा प्रवास नक्कीच संघर्षाने भरलेला आहे. कैलासने आपल्या फेसबुक पोस्टवरुन जत्रेतील फुल और काँटे चित्रपटाची आठवण सांगताना अजय देवगणसोबत काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा उल्लेख केला. कैलासचा हा प्रसंग जेवढा प्रेरणादायी आहे, तितकाच त्याच्या संषर्घाची कहानी सांगणाराही आहे.

कैलासची फेसबुक पोस्ट..! 

''साल १९९१. आमच्या राजूर ला सालाबादप्रमाणे गणपतीची जत्रा. टमटम मध्ये माणसं कोंबून बसवावी तशा दाटीवाटीने खेटून रेटून बसलेल्या जवळजवळ विसेक टुरिंग टॉकीज. लाऊडस्पीकर मधून गाण्यांचा आणि अनाऊन्स चा भडीमार! या तंबू चा आवाज त्या तंबूत आणि बघणारेही महामूर. संम्देच एकाचडी एक फायटींग चे पिच्चर आणि त्याच जत्रेत आडवा भांग पाडून दोन फटफट्यांवर उभा राहून एंट्री मारलेल्या अजय देवगण चा पिच्चर "फुल और काटे".
पचपच तेलाचा उडदाचा खंम्मक वास असलेला आठआण्याचा पापड खात खात फुफाट्यात मांडी घालून माय दादा सोबत हा पिच्चर मी पाहिला. तवा कुठे ठाव होते एक दिवस याच ठिकाणी याच हिरो संगं आपण पण याच पडद्यावर असू आणि आपल्याच धुळभरल्या हाताने "तान्हाजी" चे उदघाटन होईल म्हणून....!''

Web Title: tanhaji movie actor kailash waghmare remember of 'Phool Aur Kante' in jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.