Join us

ध्वजारोहण सोहळ्याला वेसावे कोळी वाड्यातील टपके दांपत्य विशेष अतिथि म्हणून निमंत्रित

By मनोहर कुंभेजकर | Published: January 25, 2024 5:52 PM

राज्यातील १३ मच्छीमारांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार

मुंबई- नवी दिल्ली येथे साजरा  होणाऱ्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यास मुंबईतून विशेष अतिथि  म्हणून वेसावा कोळीवाड्यातील मुंबई येथील क्रियाशील मच्छीमार प्रदीप टपके व त्यांच्या पत्नी  लिलावती टपके  यांना विशेष अतिथि म्हणून निमंत्रीत करण्यांत आले आहे.

प्रदीप टपके यांचा पारंपारीक मासेमारीचा व्यवसाय असून,ते वेसावे कोळीवाड्यातील अग्रगण्य असलेल्या वेसावा मच्छीमार वि. का.स. सोसायटी लि.चे ४७ वर्षे संचालक आहेत .

 पारंपारीक मच्छीमार तसेच मच्छीमारी क्षेत्रा बरोबरच सहकार क्षेत्रामध्ये केलेल्या कामाची पोचपावती म्हणून भारत सरकारने त्यांची दखल घेतली आहे. भारत सरकारने दिलेल्या  निमंत्रणा नुसार महाराष्ट्राती विशेष अतिथि म्हणून ते आपल्या पत्नी समवेत आज सकाळी विमानाने दिल्लीला पोहचले आहेत.

 या ध्वजारोहण सोहळा समारंभास महाराष्ट्र राज्यातील १३ मच्छीमारांचे प्रतिनिधि विशेष अतिथि म्हणून उपस्थित रहाणार असून या सर्वांचा खर्च भारत सरकार करणार आहे.