Join us

'उत्सव आरोग्याचा'; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 1:45 PM

ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकीतून स्तुत्य उपक्रम राबविण्यात गौरवास्पद कार्यरत आहे.

-  मुकेश चव्हाण

मुंबई: राज्यात कोरोनाचं संकट अजूनही कमी झालेलं नाही. तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सण साधेपणाने साजरा करत आरोग्य उत्सव साजरा करा असं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या याच आवाहनाला दक्षिण मुंबईतील ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साद दिली आहे. 

ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकीतून स्तुत्य उपक्रम राबविण्यात गौरवास्पद कार्यरत आहे. यंदाही या मंडळाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. मंडळातर्फे यंदा 'उत्सव आरोग्याचा, उत्सव सुरक्षिततेचा' असा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर यांनी दिली. या उपक्रमात गरजूंना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, डायलेसिस यांसारख्या दुर्धर आजारांची औषधे ५० टक्के सवलतीत उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे या योजनेचा सर्व गणेशभक्तांनी लाभ घ्यावा, असं माणगावकर यांनी सांगितले. तसेच अधिक माहितीसाठी साने गुरुजी मार्ग, ताडदेव येथील शिव गणेश मंदिर येथे संपर्क साधण्याचे आवाहान सेक्रेटरी सागर राणे यांनी केलं आहे. 

ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास या वर्षी ८२ वर्षे पुर्ण झाली.संपूर्ण राज्यस्तरीय मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील सर्वोत्कृष्ट मंडळ सर्वत्र गणले गेले आहेत. गेल्या दीड दोन वर्षाच्या कोरोनाकाळात ताडदेव शिवसेना शाखा,बृहन्मुंबई महानगर पालिका,आणि आमचा ताडदेवचा राजा मानवतेच्या दृष्टिकोनातून संवेदनशीलपणे विभागातील जीवन ज्योत संस्थेच्यावतीने कोवीड संसर्गजन्य रूग्णावर उपचार वैद्यकीय उपचार केंद्र, अलगीकरण, सुसज्ज आधुनिक सुखसोई बने कंपाऊंड महापालिका शाळेच्या तीन मजली इमारतीत स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.

टॅग्स :गणेशोत्सवमुंबईआरोग्य