Join us

शिक्षणखातेच ‘लक्ष्य’, चुरस भाजपा-शिवसेनेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 6:18 AM

शिक्षक मतदारसंघातील प्रचारात शिक्षकांवरील शाळाबाह्य कामे, मराठीचा मुद्दा, शैक्षणिक निर्णयांतील अनागोंदीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने एकप्रकारे शिक्षण खातेच लक्ष्य बनले.

मुंबई : पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारात मुंबई विद्यापीठाच्या कारभाराला आणि रोजगार देऊ न शकणाऱ्या शिक्षणपद्धतीवर दिलेला भर आणि शिक्षक मतदारसंघातील प्रचारात शिक्षकांवरील शाळाबाह्य कामे, मराठीचा मुद्दा, शैक्षणिक निर्णयांतील अनागोंदीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने एकप्रकारे शिक्षण खातेच लक्ष्य बनले आहे. या दोन्ही मतदारसंघातील प्रचार सध्या शिगेला पोहोचू लागला आहे. त्यात वेगवेगळे उमेदवार रिंगणात असले तरी युतीच्या दिशेने वाटचाल करणाºया शिवसेना-भाजपातील चुरस लक्षवेधी ठरेल.पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार दीपक सावंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभाराविरोधात आवाज उठवला नाही. ते मंत्रीपद भूषवण्यातच मग्न झाल्याने पदवीधरांचे प्रश्न दुर्लक्षित झाल्याचा सूर विरोधकांनी लावला आहे. या मतदारसंघात बदल घडवणे आवश्यक आहे, या भोवती त्यांचा प्रचार फिरतो आहे. त्याचबरोबर पदवीधरांना भेडसावणाºया बेरोजगारीच्या प्रश्नाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबईची- खास करून मराठी माणसाची-भाषेची उपेक्षा हाही मुद्दा प्रचारात आहे.शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपील पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रश्नांसह शिक्षणक्षेत्रातील अनागोंदीवर प्रहार केल्याचा दाखला दिला आहे. १२०० शिक्षकांना कामावरून कमी करण्याच्या नोटीस मिळाली होती, पण त्यांना न्याय मिळवल्याचे श्रेय घेण्यात अहमहमिका लागली आहे. शाळांना १०० टक्के अनुदान मिळवणे, शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या सहा टक्के व्हावा, शिक्षकांवर लादण्यात येणारे शाळाबाह्य काम बंद करू अशा मुद्द्यांची प्रचारात चलती आहे. दोन्ही मतदारसंघांतील प्रचाराची मुदत पुढील रविवारी २३ जूनला सायंकाळी पाच वाजता संपेल. त्यामुळे शनिवार-रविवारी सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा जोर लावला. रविवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील. २५ जूनला मतदान होणार आहे आणि २८ ला मतमोजणी पार पडेल.कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शेकापचा पाठिंबा घेतल्याने मुंबईत त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.>शिक्षक मतदार संघातदहा उमेदवारांत लढतमुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे कपील पाटील विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या उमेदवारीला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने प्रा. शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने प्रा. अनिल देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. बहुजन मुक्ती पक्षातर्फे मोहम्मद शेख रिंगणात आहेत. या मतदारसंघात दहा उमेदवार लढत देत आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघात उपनगरात आठ हजार २५२, मुंबई शहरात एक हजार ८८९ असे एकूण १० हजार १४१ मतदार आहेत.>सोशल मीडियाचा प्रभावी वापरशिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या ताज्या मतदारनोंदणीत मोबाइल क्रमांक, मेल आयडी नोंदवून घेतल्याने प्रचारात सोशल मीडियाचा प्रभावी वापर सुरू आहे. एसएमएस पाठवले जात आहेत. या मतदारसंघांत मतदानाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे मते मागण्यासोबतच आवर्जून मतदान करण्याचा आग्रह धरला जातो आहे.>पदवीधरांची उपनगरांवर भिस्तमुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत करत आहेत. मात्र, शिवसेनेने त्यांच्याऐवजी विभागप्रमुख असलेल्या विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने डॉ. अमित मेहता यांना उमेदवारी दिली आहे. शेकापने अ‍ॅड. राजेंद्र कोरडे यांना उमेदवारी दिली आहे. राजू बंडगर या उमेदवाराला नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाने पाठिंबा दिला आहे. जालिंदर सरोदे यांना लोकभारतीने उमेदवारी दिली आहे. बहुजन मुक्ती पक्षातर्फे रूपाली भडके रिंगणात आहेत. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार हेही या निवडणुकीत उभे आहेत. एकंदर १२ उमेदवार रिंगणात आहेत.शिवसेनेच्या हातातून हा मतदारसंघ हिसकावण्यासाठी इतर पक्षांत चुरस आहे. पण त्यांच्या लढाईत मतविभागणी होईल, असा शिवसेनेचा दावा आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात मुंबई उपनगरात ५२ हजार २८३, मुंबई शहरात १८ हजार ३५३ असे एकूण ७० हजार ६३६ मतदार आहेत. त्यामुळे उपनगरांवर उमेदवारांचे अधिक लक्ष आहे.