बड्या व्यापा-यांना ‘टार्गेट’ करणा-या टोळ्या सक्रिय
By मनीषा म्हात्रे | Published: February 8, 2018 02:07 AM2018-02-08T02:07:13+5:302018-02-08T04:34:40+5:30
दुपारची वेळ. बँकेतून पैसे काढून व्यापारी बाहेर पडला. काही समजण्याच्या आतच दुचाकीवरून आलेल्यांनी बॅग हिसकावून पळ काढला. व्यापा-याच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी तपास सुरू केला.
मुंबई : दुपारची वेळ. बँकेतून पैसे काढून व्यापारी बाहेर पडला. काही समजण्याच्या आतच दुचाकीवरून आलेल्यांनी बॅग हिसकावून पळ काढला. व्यापा-याच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी तपास सुरू केला. अशा प्रकरणात व्यापा-यांच्या वाढत्या तक्रारींमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कानडेंच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. चार पथके नेमण्यात आली. गुन्हे पद्धत आणि त्यांच्या वर्णनाच्या तुटपुंज्या माहितीवर तपास पथकाने पायधुनीसह मुंबई, ठाण्यातील कानेकोपरे पिंजून काढले. सात दिवसांच्या मेहनतीनंतर एका संशयितापर्यंत पोलीस पोहोचले; आणि नसीम, जसीम खान या भावंडांसह पुतण्या अतीफ खानला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बड्या व्यापाºयांना टार्गेट करणाºया या टोळीच्या चौकशीतून अनेक गुन्ह्यांची उकल झाली. नुसतीच अटक न करता या आरोपींना मोक्काही लावण्यात आला.
अशा स्वरूपाचे अनेक क्लिष्ट गुन्हे पायधुनी पोलिसांनी मार्गी लावले आहेत. जवळपास साडे तीन लाख लोकसंख्या असलेला या परिसरात मुस्लीमबहुल लोकवस्ती अधिक आहे. अंडरवर्ल्डचेही या ठिकाणाशी जवळचे नाते. त्यात सायबर गुन्हेगारीनेही डोके वर काढल्याने त्यावर रोख आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कानडे यांनी गस्तीवर अधिक भर दिला. मोहल्ला कमिटी तसेच सार्वजनिक सभांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे नागरिकांकडून त्यांना माहिती मिळण्यास सुरुवात झाली. स्ट्रीट क्राइमवर रोख येत आहे.
शिवाय ८ तास ड्युटीचेही नियोजन येथे होत आहे. २०१६
मध्ये ३७४ तर २०१७मध्ये ३६५ गुन्ह्यांची नोंद पायधुनी पोलीस ठाण्यात झाली आहे. अवघ्या १६० मनुष्यबळाच्या आधारे पायधुनी पोलीस चोखपणे आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
>कायदा व सुव्यवस्थेसाठी नागरिकांचे सहकार्य नेहमीच मिळते. मात्र, त्यांनी सायबर गुन्ह्यांबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तीपासून आलेली फ्रेण्ड रिक्वेस्ट, डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती शेअर करू नये; शिवाय कसल्याही आमिषाला बळी पडू नये.
- अविनाश कानडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पायधुनी पोलीस ठाणे
>कुटुंबाप्रमाणेच साजरा होतो वाढदिवस
अविनाश कानडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाºयांच्या सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष दिले. यामध्ये येथे शिपायापासून अधिकाºयांपर्यंत प्रत्येक कर्मचाºयाचा वाढदिवस साजरा केला जातो.
>महत्त्वाची ठिकाणे
मिनारा मशीद, भेंडी बाजार जंक्शन, मोहम्मद अली रोड, केमिकल मार्केट, सिमेंट चाळ, भट बाजार, दाणाबंदर, जुना बंगालीपुरा, ग्लास मार्केट, टाटा पॉवर हाउस, लोहा भवन, भंडारी स्ट्रीट
>येथे करा संपर्क
वरिष्ठ पोलीस निरीक्षक - अविनाश कानडे
९८७०१७४९६९, ०२२-२३४३६११४
पोलीस ठाणे
०२२-२३४६३३३३
>परिमंडळ - २
पोलीस उपायुक्त - ज्ञानेश्वर चव्हाण
बीट चौकी - ४
भेंडीबाजार, धोबळे भवन,
भंडारी स्ट्रीट, टाटा पॉवर हाउस
लोकसंख्या - साडे तीन लाख
मनुष्यबळ - १६० अधिकारी, कर्मचारी