हुश्श... मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट अखेर पूर्ण! पालिकेच्या तिजोरीत चार हजार ८५६ कोटी जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 09:46 AM2024-05-27T09:46:48+5:302024-05-27T09:48:42+5:30
अंधेरी, विलेपार्ल्यातून सर्वाधिक करसंकलन.
मुंबई : मालमत्ताधारकांना उशिरा पाठविलेल्या मालमत्ता कराच्या बिलांमुळे यंदा पालिकेच्या करवसुलीच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, पालिकेने २५ मे अखेर चार हजार ८५९ कोटी ५३ लाख ६७ हजार रुपये कर संकलित केला आहे.
२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी प्रशासनाने साडेचार हजार कोटी रुपये कर संकलनाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यापेक्षा ३५६.३८ कोटी रुपये अधिकचा कर पालिकेने वसूल केला आहे. दरम्यान, मालमत्ता कर भरण्यासाठी दिलेली २५ मे रोजीची मुदत आता संपली आहे. २५ मे रोजी एकाच दिवसात १७०.५९ कोटी रुपयांचा कर संकलित करण्यात आला. तर, आता यापुढे मालमत्ताधारकांकडून दरमहा दोन टक्के दंड आकारण्यात येणार आहे. दरम्यान, २६ मे रोजी १.५२ कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाल्याचे पालिकेने सांगितले.
पालिकेकडे जमा झालेल्या करात शहरातील १,४२५ कोटी ०१ लाख ३१ हजार रुपये, पश्चिम उपनगरातील २,४५५ कोटी ९० लाख ५७ हजार रुपये आणि पूर्व उपनगरातील ९६८ कोटी १३ लाख ५८ हजार रुपये तसेच शासकीय, बंदर आणि रेल्वे यांच्या अखत्यारितील मालमत्तांच्या कराच्या १० कोटी ४८ लाख २१ हजार इतक्या रकमेचा समावेश आहे.
पालिकेने यंदा कराची बिले उशिरा पाठविल्याने त्याच्या वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले. करभरणा करण्यासाठी मालमत्ताधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व नागरी सुविधा केंद्रे रविवारी, शनिवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू ठेवली होती. बरीच वर्षे करभरणा न करणाऱ्या व थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांना पालिकेचे अधिकारी स्वतः भेट देऊन नोटीस बजावत होते.
विभागनिहाय मालमत्ता कर संकलन (रुपयांत)-
१) ए विभाग- २१४ कोटी ९१ लाख ४९ हजार
२) बी विभाग- ३३ कोटी ९५ हजार ०२ लाख
३) सी विभाग- ६१ कोटी २२ लाख ४९ हजार
४) डी विभाग- १९३ कोटी ०२ लाख ४३ हजार
५) ई विभाग- १०५ कोटी २६ लाख ३४ हजार
६) एफ दक्षिण विभाग- १०० कोटी २६लाख ३४ हजार
७) एफ उत्तर विभाग- ११४ कोटी १९ लाख २८ हजार
८) जी दक्षिण विभाग- ४१९ कोटी ५३ लाख ८९ हजार
९) जी उत्तर विभाग- १८२ कोटी ७४ लाख ५९ हजार
१०) एच पूर्व विभाग- ४५६ कोटी ६६ लाख ६८ हजार
११) एच पश्चिम विभाग- ३०१ कोटी २४ लाख ८१ हजार
१२) के पूर्व विभाग- ४६३ कोटी ५८ लाख ०१ हजार
१३) के पश्चिम विभाग- ४०६ कोटी ८१ लाख ४२ हजार
१४) पी दक्षिण विभाग- २७० कोटी ४० लाख २५ हजार
१५) पी उत्तर विभाग- १८० कोटी ७२ लाख २२ हजार
१६) आर दक्षिण विभाग- १४३ कोटी ८९ लाख ७६ हजार
१७) आर मध्य विभाग- १७० कोटी १९ लाख ९८ हजार
१८) आर उत्तर विभाग- ६२ कोटी ३७ लाख ४४ हजार
१९) एल विभाग विभाग- २११ कोटी ३० लाख ४५ हजार
२०) एम पूर्व विभाग- ७३ कोटी ३१ लाख ५५ हजार
२१) एम पश्चिम विभाग- १०३ कोटी ३४ लाख ११ हजार
२२) एन विभाग विभाग- १६१ कोटी ६१ लाख ९८ हजार
२३) एस विभाग विभाग- २८२ कोटी ३० लाख ४४ हजार
२४) टी विभाग विभाग- १३६ कोटी २५ लाख ०५ हजार