उत्पन्नाचे २,१६६ कोटींचे लक्ष्य अजूनही दूरच
By admin | Published: January 20, 2015 02:11 AM2015-01-20T02:11:24+5:302015-01-20T02:11:24+5:30
राज्यात एलबीटी लागू झाल्यापासून महापालिकेची आर्थिक स्थिती पुरती कोलमडलेली आहे. सद्य:स्थितीत कर्मचाऱ्यांचा पगार निघेल एवढाच पैसा शिल्लक असल्याचे ठाणे पालिकेचे म्हणणे आहे.
अजित मांडके - ठाणे
राज्यात एलबीटी लागू झाल्यापासून महापालिकेची आर्थिक स्थिती पुरती कोलमडलेली आहे. सद्य:स्थितीत कर्मचाऱ्यांचा पगार निघेल एवढाच पैसा शिल्लक असल्याचे ठाणे पालिकेचे म्हणणे आहे. त्यात महासभेने सादर केलेले अंदाजपत्रक अद्याप मंजूर झाले नाही. प्रशासनाने सादर केलेल्या २,१६६ कोटींच्या अंदाजपत्रकानुसार पालिकेला २०१४ अखेर केवळ ९८७ कोटींचेच उत्पन्न मिळाले आहे. सुमारे ९३३.०२ कोटींचा खर्च पालिकेने केला आहे. यामध्ये पालिका कर्मचाऱ्यांच्या ५५० कोटींच्या आसपास असलेल्या पगारासह इतर खर्चांचा समावेश आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकानुसार ४५.५७ टक्के उत्पन्न पालिकेला मिळाले असून त्यातील ४३.०८ टक्के निधी खर्च झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती कोलमडल्यावरून अनेक स्थित्यंतरे झाली. सर्वपक्षीय सदस्यांनी तर प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली. पालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून उपसमिती तयार करण्यात आली आहे. परंतु, आजही ते वाढताना दिसत नाही. महासभेने २७०० कोटींचे अंदाजपत्रक तयार करून ते प्रशासनाकडे अंतिम मंजुरीसाठी दिले आहे. परंतु, पालिकेची कोलमडलेली स्थिती पाहता प्रशासनाने पालिका आयुक्तांनी सादर केलेल्या २१६६ कोटींच्या अंदाजपत्रकानुसार काम सुरू ठेवले आहे. महासभेने अंदाजपत्रक फुगविल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, प्रत्यक्षात प्रशासनानेच स्पील ओव्हरच्या सुमारे ३०० कोटींहून अधिकच्या रकमा न दाखविल्याने हे अंदाजपत्रक फुगल्याचा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी केला आहे. त्यामुळे सदस्य विरुद्ध प्रशासन, असा सामना पालिकेत रंगला आहे.
दुसरीकडे पालिका आयुक्तांनी सादर केलेल्या २१६६ कोटींच्या अंदाजपत्रकानुसार पालिकेच्या तिजोरीत विविध स्रोतांच्या माध्यमातून पालिकेला जे ९८७.१२ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे, त्यामध्ये ३०२.६९ कोटींच्या प्रस्तावित अनुदानापैकी ७१.६९ कोटी, ३३८.१९ कोटींच्या कर्जापैकी ४०.९६ कोटी आणि महापालिकेच्या विविध माध्यमांतून प्रस्तावित १५२५ कोटींपैकी ८७४.४७ कोटींच्या उत्पन्नाचा समावेश आहे. तसेच पालिकेने आतापर्यंत उत्पन्नानुसार केलेला खर्च ९३३.०२ कोटींचा आहे. यामध्ये महसुलासाठी प्रस्तावित असलेल्या १०७८.७४ कोटींपैकी ५४१.०५ कोटी, भांडवली खर्च अ आणि क मधील ६६७.४४ पैकी २९८.२३ कोटी, भांडवली खर्च (जेएनएनयूआरएम) मधील ४१९.५८ कोटींपैकी ९३.७४ कोटी खर्च करण्यात आले आहेत. याचाच अर्थ पालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकानुसार पालिकेला ३१ डिसेंबर २०१४ अखेर ४५.५७ टक्के उत्पन्न प्राप्त झाले असून त्यातील ४३.०८ टक्के खर्च करण्यात आला आहे.
विविध स्रोतांपासून मिळालेले उत्पन्न
विभागाचे नावटार्गेटप्राप्त उत्पन्न
(कोटींत)(कोटींत)
मालमत्ता कर३०२.९१ १५६.५१
एलबीटी६५० ४०५
जाहिरात विभाग८.८९३.८८
सार्वजनिक बांधकाम१६.७५४७.१४
अग्निशमन दल४४.१३३१.२९
शहर विकास३५५.००१७०.४७
पाणीपुरवठा१०५.००३९.९०
इतर आकार४२.३२२०.०५
एकूण१५२५८७४.४७