'कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 12:42 PM2020-07-02T12:42:36+5:302020-07-02T12:46:41+5:30
कोरोनाशी आपण गेल्या ३ महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यूदर वाढणे बरोबर नाही.
मुंबई - कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क फोर्स तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर, आता वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीही यासंदर्भात माहिती दिली. COVID_19 विरूद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमण्यात येणार असल्याचं अमित देशमुख यांनी म्हटलंय.
कोरोनाशी आपण गेल्या ३ महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यूदर वाढणे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण सापडविणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे , या कामांत अजिबात ढिलाई नको असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होते. त्यानंतर, आता अमित देशमुख यांनीही यासंदर्भात माहिती दिली.
#COVID_19 विरूद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमण्यात येणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh यांची माहिती pic.twitter.com/QWAV6CfhWS
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 2, 2020
दरम्यान, यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यूदर वाढणे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्णांचा शोध घेणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलद शोधणे हा एकमेव मार्ग आहे. प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल लगेच मिळायला हवेत, अशा सूचना असताना काही ठिकाणी ७२ तास लागत असतील तर ती गंभीर बाब आहे, याची जाणीव करून देत कोणत्याही परिस्थितीत ढिलाई नको, असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.
मुंबई येथे डॉक्टर्सचा टास्क फोर्स आपण स्थापन केला त्याचा चांगला उपयोग झाला. त्यामुळेच, आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे, प्रत्येक जिल्ह्यात टास्कफोर्स स्थापनेसाठी गतीमान हालचाली सुरु आहेत. यामध्ये तेथील जुने जाणते, तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत आणि त्यांचा मुंबईच्या डॉक्टर्सशी देखील कायम संपर्क असावा. आरोग्य मंत्रालयाकडून उपचार पद्धती, औषधी याबाबत विविध सूचना येत असतात , त्यात बदलही होत असतात त्यादृष्टीने वरिष्ठ डॉक्टर्सचा सहभाग वाढवणे महत्वाचे आहे.