Join us

शिवसैनिकांना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने यांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:06 AM

मुंबई : शिवसैनिकांना सध्या वाढत असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत ते ...

मुंबई : शिवसैनिकांना सध्या वाढत असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत ते पोहोचवावे, या भावनेतून सर्व शाखांमधील शिवसैनिकांकरिता शासनाच्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने यांच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबईच्या माजी महापौर आणि कोविड टास्क फोर्सच्या सदस्य डॉ. शुभा राऊळ, कोविड टास्क फोर्स सदस्य, बी. के. सी. कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी नागरिकांना कोरोना विषाणूबद्दल माहिती दिली. तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन केले.

यावेळी सहभागी शिवसैनिक, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक यांना कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात? या कालावधीत समतोल आहार व व्यायाम कसा असावा, शरिरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यावर काय करावे? रुग्णाला रुग्णालयात दाखल कधी करावे? तसेच रुग्ण बरा झाल्यानंतर काही महिने कोणती काळजी घ्यावी, याविषयी माहिती देताना लसीकरणाबद्दलही सविस्तर माहिती देण्यात आली.