गटाराच्या बाजूलाच बनते टेस्टी... टेस्टी आइस्क्रीम
By admin | Published: April 12, 2015 11:28 PM2015-04-12T23:28:05+5:302015-04-12T23:28:05+5:30
गटाराच्या सांडपाणी वाहिनीच्या बाजूलाच वडापाव, भजीचे स्टॉल बऱ्याच ठिकाणी टाकले जातात. अंडापाव, अगदी भाजी-पोळीची केंद्रेही थाटली जातात
पूनम धुमाळ, लोणेरे
गटाराच्या सांडपाणी वाहिनीच्या बाजूलाच वडापाव, भजीचे स्टॉल बऱ्याच ठिकाणी टाकले जातात. अंडापाव, अगदी भाजी-पोळीची केंद्रेही थाटली जातात. यात आता भर पडलीये ती आइस्क्रीमच्या मेजवानीची. विकण्याचा धंदा सोडाच, लोणेरेत सांडपाणी वाहिनीच्या जवळ गटाराला लागूनच सध्या आइस्क्रीम तयार करण्याचा धंदा तेजीत चाललेला आहे.
सध्या उन्हाळ्याचा सीझन असल्याने नागरिक आपली तहान भागविण्यासाठी व थोड्याशा थंडाव्यासाठी शीतपेये, आइस्क्रीमच्या गाड्या, फळांवर ताव मारताना दिसत आहेत. मात्र याचाच फायदा उठवत काही विक्रेते नागरिकांच्या आरोग्याशीच खेळ मांडताना दिसत आहेत. साईनगर, गोरेगाव येथे रस्त्याच्या कडेलाच रूम भाड्याने घेऊन हे परप्रांतीय उन्हाळ्याचा मोका साधून उघड्यावर आइस्क्रीम बनविण्याचा उद्योग करीत आहेत. या रोडच्या बाजूलाच झाडाखाली शेड टाकून आइस्क्रीमसाठी लागणारे दूध तापविण्यासाठी एक भली मोठी कढई ठेवली आहे. या कढईत रोज सुमारे ५० लीटर दूध तापविले जाते. दूध गरम करताना त्यावर झाकण तर नाहीच मात्र इतरही कोणती सुरक्षितता नसल्याने रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या वाहनांची धूळ त्या दुधात मिसळते.
दुधाची कढई चुलीवर मांडून ठेवल्याने चुलीची राखही दुधातच पडते. कामगारांच्या जेवणाची इतरत्र पडलेली भांडीही येथेच पडून असतात. सांडपाण्याचाही मोठा प्रश्न आहे.