आयआयटी मुंबईच्या अध्यक्षपदी टाटा?
By admin | Published: May 27, 2015 01:45 AM2015-05-27T01:45:04+5:302015-05-27T01:45:04+5:30
बोर्ड आॅफ गव्हर्नर्सने आयआयटी मुंबईच्या अध्यक्षपदासाठी तीन व्यक्तींची नावे सुचविली असून त्यामध्ये उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाचा समावेश आहे.
मुंबई : बोर्ड आॅफ गव्हर्नर्सने आयआयटी मुंबईच्या अध्यक्षपदासाठी तीन व्यक्तींची नावे सुचविली असून त्यामध्ये उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाचा समावेश आहे. अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा कार्यकाल ११ मे रोजी संपुष्टात आल्याने अध्यक्षपदाची जागा सध्या रिक्त आहे.
आयआयटी पाटणा, भुवनेश्वर आणि रोपड या तीन आयआयटींच्या संचालकपदाच्या निवडीवरून काकोडकर आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांच्यात मतभेद झाले होते. या कारणावरून काकोडकर यांनी मुंबई आयआयटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. अखेर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने आयआयटी मुंबईचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. ७७ वर्षीय रतन टाटा हे स्टॅनफर्ड विद्यापीठाशी मॅनेजमेंट सायन्स आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे सल्लागार प्राध्यापक म्हणून काम पाहत होते आणि त्याचबरोबर आयआयटी मुंबईच्या सल्लागार समितीचे सदस्यही आहेत.