मुंबई - पदावरून निवृत्त होत असलो तरी मी या ठिकाणी स्तनांच्या कर्करोग विभागात कार्यरत राहणार आहे. मी येथे पालक म्हणून कार्यरत होतो. सर्वांच्या सहकार्याने काम करता आले, याचा आनंद आहे. टाटा हॉस्पिटल आणि मी वेगळे होऊ शकत नाही, हे भावोत्कट उद्गार आहेत डॉ. राजेंद्र बडवे यांचे. गेल्या चार दशकांपासून टाटा हॉस्पिटलच्या सेवेत असलेले डॉ. बडवे गुरुवारी, ३० नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत.
डॉ. राजेंद्र बडवे यांनी कारकिर्दीची सुरुवात केईएम रुग्णालयापासून केली. १९८३ मध्ये ते टाटा हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टर म्हणून रुजू झाले. गेली १५ वर्षे डॉ. बडवे टाटा मेमोरिअल सेंटरचे मुख्य संचालक म्हणून कार्यरत होते. साठाव्या वर्षी निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी सात वर्षे संचालक म्हणून काम केले. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
संशोधन जगभरडॉ. बडवे यांनी स्तनांच्या कर्करोग या विषयात केलेले संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय परिषदेमध्ये सादर केले आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी स्तनांच्या कर्करोग शस्त्रक्रियावरील नवीन संशोधन पॅरिस येथील वैद्यकीय परिषदेत मांडले होते.-डॉ. सुदीप गुप्ता, नवे संचालक (टाटा मेमोरियल सेंटरचे नवीन संचालक म्हणून डॉ. गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे)
या पदावर काम करत असताना देशभरात १० ठिकाणी कॅन्सरची रुग्णालये सुरू करण्यासाठी काम करू शकलो. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांनी खूप मदत केली. देशातील अनेक राजकारण्यांनी टाटा हॉस्पिटलला भेटी दिल्या आहेत. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री या ठिकाणी येतात, दिवसभर रुग्णालयात थांबतात. सर्व कामकाजाची पाहणी असेच रुग्णालय आमच्यासाठी सुरू करा, असे सांगतात. हवा तेवढा निधी देण्याचे सांगतात.येथे काम करण्याचा अनुभव हा वेगळा,- डॉ. राजेंद्र बडवे