‘टाटाचा टॉवर सुरक्षितच’
By admin | Published: September 23, 2014 02:19 AM2014-09-23T02:19:46+5:302014-09-23T02:19:46+5:30
भांडुप उषानगर सोसायटीच्या टाटा पॉवरच्या टॉवरविरोधातील लढ्यात रहिवाशांनी आक्रमक भूमिका बजावत हायकोर्टात याचिका दाखल केली
मुंबई : भांडुप उषानगर सोसायटीच्या टाटा पॉवरच्या टॉवरविरोधातील लढ्यात रहिवाशांनी आक्रमक भूमिका बजावत हायकोर्टात याचिका दाखल केली असून, त्यांना शुक्रवारी सुनावणीसाठी बोलावले असल्याचे समजते. रहिवाशांंचा विरोध होत असताना टाटा पॉवरचा ट्रान्समिशनचा प्रकल्प हा कायदेशीर आणि शासकीय पूर्ततेबरोबरच आरोग्यविषयकही हानिकारक नसल्याचा दावा टाटा पॉवर कंपनीने केला आहे.
टाटा पॉवर कंपनीच्या म्हणण्यानुसार, एमईआरसी भाग २२० केव्ही ट्रॉम्बे - धारावी सेलसेट ट्रान्समिशन लाइन मंजूर आहे. या योजनेंतर्गत (२२० केव्ही सर्किटचे)
१०५ नवीन ट्रान्समिशन टॉवर्स उभे करण्यात येत आहेत. यापैकी ९९ ठिकाणी अद्ययावत काम पूर्ण झाले आहे; मात्र उषानगर सोसायटीतील रहिवासी टाटा पॉवर आणि पालिका अधिकारी यांंच्या निर्णयांशी सहमत नाहीत. यावर विचारविनिमय करून सदर निर्णयाला लागू कायद्यांतर्गत अधिकार दिले आहेत. त्यातही याबाबत योग्य अभ्यास आणि स्थानिकांंच्या आरोग्यावर याचा परिणाम होणार नाही आदींंची
माहिती घेत याचे काम सुरू करण्यात येत असल्याचे कंपनीचे म्हणणे
आहे. (प्रतिनिधी)