मनोहर कुंभेजकर मुंबईत नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळामुळे मालाड पश्चिम मढ येथील कोळी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांच्या बोटींचे तर तुकडे तुकडे झाले. येथील सुमारे 300 कोळी बांधवांना आज सायंकाळी मढ मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते देवेंद्र भेट म्हणून 300 अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी मुंबईत हा उपक्रम सुरू केला आहे.
खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकार कडून येथील अपादग्रस्त मच्छिमारांना मदत मिळेल. परंतू त्यांची रोजीरोटी गेल्याने त्यांना त्वरित दिलासा म्हणून "देवेंद्र भेट" योजनेतून अन्न धान्य किट उपलब्ध करून दिल्याबद्धल खासदार गोपाळ शेट्टी यांनी तेजिंदर सिंग तिवाना व मुंबई भाजपा चिटणीस विनोद शेलार यांचे कौतुक केले.
येथील मच्छिमार बोटींचे या वादळात तुकडे तुकडे झाले आहे.त्यामुळे जनसेवा बँकेचे अध्यक्ष अँड. जयप्रकाश मिश्रा यांच्या संकल्पनेतून येथील कोळी बांधवाना कमी व्याजाने लोन देण्यात येईल. त्यांच्या मासेमारी धंदा सुरू झाल्यावर सहा महिने त्यांच्याकडून बँकेचे हप्ते घेतले जाणार नाही अशी माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी यावेळी दिली.
यावेळी तेजिंदर सिंग तिवाना, विनोद शेलार ,योगेश वर्मा, अँड.जयप्रकाश मिश्रा,मालाड भाजपा अध्यक्ष सुनील कोळी,युनूस खान,भाजयुमो उत्तर मुंबई अध्यक्ष अमर शाह,मुकेश भंडारी,मढ मच्छिमार विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष हरिश्चंद्र आखाडे,व्यवस्थापक तुकाराम कोळी आणि भाजयुमोचे मुंबईतील पदाधिकारी व मच्छिमार बांधव व कोळी महिला उपस्थित होत्या.
यामुळे कोळी समाजातील समुदायाचे, परिसरातील लोकांचे जीवनमान बाधित झाले. चक्रीवादळाच्या वादळामध्ये कोळी कुटुंबांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे त्यांच्या होड्या आहेत ज्याचा त्यांच्यावर काम करणारे खलाशी आणि त्यांच्या बोटींच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला आहे. कोरोना महामारीच्या काळात नव्या बोटींचा तोडगा काढण्यास आता वेळ लागेल. खासदार गोपाल शेट्टी यांनी काल मढ परिसराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि कोळी समाजातील नागरिकांच्या झालेल्या नुकसानाविषयी सांगितले.भारतीय जनता युवा मोर्चाने मुंबईने "देवेंद्र भेट" वितरणाची मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. या कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीत कोळी समाजातील नागरिकांना आधार मिळावा. तसेच चक्रीवादळाने प्रभावित कोळी समाजातील सर्व घरांमध्ये "देवेंद्र भेट" वितरणाचे उद्घाटन खासदार गोपाल शेट्टी यांच्या हस्ते झाले अशी माहिती तेजिंदर सिंग तिवाना यांनी दिली