Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळाच्या नावाने सोशल मीडियात चर्चा: 'अशी' देतात चक्रीवादळांना नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 10:22 AM2021-05-17T10:22:50+5:302021-05-17T10:33:28+5:30

सध्या आलेल्या चक्रीवादळाला म्यानमारने सुचविलेले तौक्ते हे नाव देण्यात आले आहे. यानंतर येणाऱ्या चक्रीवादळांना ओमानचे यास, पाकिस्ताने गुलाब, कतारचे शहीन, सौदीचे जवाद अशी नावे देण्यात येतील

Tauktae Cyclone: Names hurricanes; Pakistan rose, Qatar lost and India Gati | Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळाच्या नावाने सोशल मीडियात चर्चा: 'अशी' देतात चक्रीवादळांना नावे

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळाच्या नावाने सोशल मीडियात चर्चा: 'अशी' देतात चक्रीवादळांना नावे

googlenewsNext

मुंबई : तौक्ते या चक्रीवादळाच्या नावाने समाज माध्यमामध्ये आता चर्चा रंगत आहे. पण या चक्रीवादळांना नावे कशी दिली जातात? याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. चक्रीवादळांना नावे देण्यासाठी बांग्लादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, यूएई आणि येमेन या १३ देशांनी सुचविलेली नावे क्रमाक्रमाने घेतली जातात. यापूर्वी बांग्लादेशने सुचविलेले निसर्ग हे नाव झाले. त्यानंतर भारताने सुचविलेले गटी, इराणने सुचविलेले निवार, मालदीवने सुचविलेले बुरेवी ही नावे झाली. सध्या आलेल्या चक्रीवादळाला म्यानमारने सुचविलेले तौक्ते हे नाव देण्यात आले आहे. यानंतर येणाऱ्या चक्रीवादळांना ओमानचे यास, पाकिस्तानचे गुलाब, कतारचे शहीन, सौदीचे जवाद अशी नावे देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. 

२००४ पासून आलेल्या वादळांची नावे
२००४ : ओनील आणि अग्नी अशी २ चक्रीवादळे झाली.
२००५ : हिबरू, प्याल, बाज, फनुस अशी ४ चक्रीवादळे वादळे झाली.
२००६ : माला, मुकदा, ओग्नी अशी ३ चक्रीवादळे झाली.
२००७ : आकाश, गोणू, येमिन आणि सिद्र अशी ४ चक्रीवादळे झाली.
२००८ : नरगीस, रश्मी, खैमुक, नीशा अशी ४ चक्रीवादळे झाली.
२००९ : बिजली, ऐला, फयान, वार्ड अशी ४ चक्रीवादळे झाली.
२०१० : लैला, बंडू, फेट, गिरी आणि जल अशी ५ चक्रीवादळे झाली.
२०११ : केइला, खणे अशी २ चक्रीवादळे झाली.
२०१२ : मुरजन आणि नीलम अशी २ चक्रीवादळे झाली.
२०१३ : वियारू, फइलिन, हेलन, लेहर आणि माडी अशी ५ चक्रीवादळे झाली.
२०१४ : नौनक, हुधुड, निलोफर अशी ३ चक्रीवादळे झाली.
२०१५ : आशोबा, कोमेन, चपला, मेघ अशी ४ चक्रीवादळे झाली.
२०१६ : रोअनू, क्यांट, नड, वर्दह अशी ४ चक्रीवादळे झाली.
२०१७ : मरुथ, मोरा, ओक्खी अशी ३ चक्रीवादळे झाली होती.
२०१८ : सर्वात जास्त ७ चक्रीवादळे झाली. त्यांची नावे सागर, मेकुनू, दये, लुबान, टिटली, गज आणि फेथाई.
२०१९ : फनी, वायू, हिक्का, क्यार, महा, बुलबुल, पवन अशी ७ चक्रीवादळे झाली.
२०२० : आम्फन, निसर्ग, गाटी, निवार, बुरेवी अशी ५ चक्रीवादळे झाली.
२०२१ : पहिले चक्रीवादळ तौक्ते या नावाचे आले आहे.

Web Title: Tauktae Cyclone: Names hurricanes; Pakistan rose, Qatar lost and India Gati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.