ठळक मुद्दे२२ जणांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील यल्लो गेट पोलीस ठाण्यात २२ एडीआर म्हणजेच अपघाती मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या बार्जवरील २७४ कामगारांपैकी २२० जणांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. तर २२ जणांचा मृत्यू झाल्याबाबत यल्लो गेट पोलीस ठाण्यात २२ अपघाती मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबईपोलिसांचे प्रवक्ते एस. चैतन्य यांनी दिली आहे.
तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या बार्जवरील २७४ कामगारांपैकी २२० जणांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. मात्र, बार्ज बुडाल्याने बेपत्ता असलेल्यांपैकी २२ जणांचे मृतदेह मिळाले आहेत. तौक्तेने आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. आता उर्वरित कामगारांच्या शोध मोहिम नौदलाने तीव्र केली आहे. मात्र, २२ जणांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील यल्लो गेट पोलीस ठाण्यात २२ एडीआर म्हणजेच अपघाती मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.