Join us

Tauktae Cyclone: जगायची इच्छा होती पण, लाटांनी मरण दाखविले; वाचलेल्यांनी सांगितला समुद्रातला भीषण थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 10:00 AM

बार्ज बुडत होती तसा धीर खचत होता. लाइफ जाकीट घालून समुद्रात उडी घेतली

मुंबई : तौउते चक्रीवादळाच्या तडाख्याने बार्ज पी-३०५ बुडत गेली तशी आम्ही सर्वांनी स्वतःला समुद्रात झोकून दिले. जेव्हा नौदलाच्या बोटी आल्या तेव्हा जगण्याची आशा निर्माण झाली. जोर लावत आम्ही तिकडे जायचो; पण येणाऱ्या लाटा आम्हाला दोनशे मीटर लांब फेकून द्यायच्या. तीन-चार तासाच्या या लंपडावाने कंटाळून आमच्यातील काहींनी स्वतःला समुद्राच्या हवाली केले. जगायची इच्छा होती; पण लाटा मरण दाखवत होत्या; पण अशातच एका लाटेने आम्हाला नौदलाच्या बोटीकडे ढकलेले आणि आम्ही वाचलो, अशा शब्दात सुटका झालेल्या कर्मचाऱ्यांनी समुद्रात क्षणाक्षणाला चाललेला जीवनमरणाचा लपंडाव विशद केला आहे.

पहिल्याच फटक्यात १८ जण दिसेनासे झालेवादळाच्या तडाख्याने बार्ज बुडत होती. जीव वाचवण्यासाठी चार-पाच, दहा-बारा जण, अशा प्रकारे जमेल तसे आम्ही हातात हात घालून सुमद्रात उडी मारली; पण लाटेच्या पहिल्याच फटक्यात १७-१८ जण दिसेनासे झाले, अशी माहि­ती अभिषेक आव्हाड यांनी दिली.

काही तळाशी गेलेबार्ज बुडत होती तसा धीर खचत होता. लाइफ जाकीट घालून समुद्रात उडी घेतली; पण काहींना वाचणार नाही याची खात्री झाली, धीर खचलेले बार्जसह बुडाल्याचे विशाल केदार हताशपणे म्हणाले.

टॅग्स :तौत्के चक्रीवादळ