Tauktae Cyclone : ओएनजीसीची जहाजे नेमकी कशामुळे अडकली? चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 02:02 PM2021-05-20T14:02:43+5:302021-05-20T14:03:57+5:30
या समितीत जहाजबांधणी महासंचालक अमिताभ कुमार, हायड्रोकार्बन महासंचालक एस.सी.एल.दास आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव नाझली जाफरी शायीन यांचा समावेश आहे. संबंधित घटनांची चौकशी ही समिती करणार आहे.
मुंबई- तौक्ते चक्रीवादळात ओएनजीसीची जहाजे अडकून पडण्यामागील घटनांची चौकशी करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची अनेक जहाजे आणि त्यांवरील 600 होऊन अधिक लोक, तौक्ते चक्रीवादळाच्या वेळी किनाऱ्याजवळील सागरी भागात अडकून पडले होते. अशा अडकण्यामुळे तसेच वाहून जाण्यामुळे व अन्य कारणांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. (Tauktae Cyclone What exactly caused ONGC's ships to get stuck Establishment of a high level committee for inquiry)
या समितीत जहाजबांधणी महासंचालक अमिताभ कुमार, हायड्रोकार्बन महासंचालक एस.सी.एल.दास आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव नाझली जाफरी शायीन यांचा समावेश आहे. संबंधित घटनांची चौकशी ही समिती करणार आहे. गरज भासल्यास या समितीत आणखीही काही मंडळींचा समावेश करून त्यांचे सहकार्य घेतले जाऊ शकते. एका महिन्यात या समितीला अहवाल सादर करावयाचा आहे.
ONGC विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दोषींना जबाबदार ठरवून शिक्षा द्या : नवाब मलिक
समितीवर असेल अशी जबाबदारी -
1. ही जहाजे अडकणे व वाहून जाणे याला कारणीभूत ठरलेल्या घटनाक्रमाची तसेच अन्य प्रसंगांची चौकशी करणे
2. हवामानशास्त्र विभाग आणि अन्य वैधानिक अधिकरणांनी दिलेल्या पूर्वसूचना पुरेशा विचारात घेतल्या घेल्या होत्या का व त्यावर उचित कार्यवाही झाली होती का?- याची चौकशी करणे
3. जहाजांच्या सुरक्षेशी संबंधित तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित एसओपी अर्थात प्रमाणित कार्यान्वयन प्रणालीचे योग्य पद्धतीने अनुसरण झाले होते का?- याची चौकशी करणे
4. जहाजे अडकण्यास व वाहून जाण्यास कारणीभूत ठरलेल्या व्यवस्थेतील त्रुटी दाखवून देणे
5. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिफारशी करणे
Cyclone Tauktae: तौक्तेच्या तांडवात नौदलाला आतापर्यंत 37 मृतदेह सापडले; 38 अद्याप बेपत्ता