Join us

रेशन दुकानात ३५ रुपये किलो दरानेच तूरडाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 5:47 AM

मुंबई-ठाणे क्षेत्रातील अधिकृत शिधावाटप दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या तूरडाळीच्या पाकिटांवर ५५ रुपये प्रतिकिलो असा दर छापलेला असला तरी या पाकिटांवर ३५ रुपये प्रतिकिलो असे स्टिकर लावून त्याच दराने

मुंबई : मुंबई-ठाणे क्षेत्रातील अधिकृत शिधावाटप दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या तूरडाळीच्या पाकिटांवर ५५ रुपये प्रतिकिलो असा दर छापलेला असला तरी या पाकिटांवर ३५ रुपये प्रतिकिलो असे स्टिकर लावून त्याच दराने विक्री करण्याच्या सूचना रास्त भाव दुकानदारांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी दिली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २००३ अन्वये मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात लाभार्थी निश्चित करून, शहरी भागातील सध्याच्या बीपीएल शिधापत्रिकांव्यतिरिक्त एपीएल (केशरी) शिधापत्रिकांमधून कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा ५९ हजार रुपयांपर्यंत असलेल्या लाभार्थ्यांमधून प्राधान्य गटातील लाभार्थी म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ३ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे प्रतिव्यक्ती २ किलो तांदूळ व रुपये २ प्रतिकिलो याप्रमाणे प्रतिव्यक्ती ३ किलो गहू वितरण करण्यात येत आहे, असेही या वेळी सांगण्यात आले.

टॅग्स :मुंबईअन्नठाणे