तावडे यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस काढणार मोर्चा
By admin | Published: February 28, 2016 02:13 AM2016-02-28T02:13:56+5:302016-02-28T02:13:56+5:30
जनतेची दिशाभूल, फसवणूक करणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे. २ मार्च रोजी दुपारी १ वाजता विलेपार्ले येथील तावडे
मुंबई : जनतेची दिशाभूल, फसवणूक करणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे. २ मार्च रोजी दुपारी १ वाजता विलेपार्ले येथील तावडे यांच्या निवासस्थानावर पक्षातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
मंत्रीपदी असतानादेखील तावडे हे ६ कंपन्यांचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. नियमानुसार, मंत्री झाल्यास ६० दिवसांच्या आत इतर कंपन्यामध्ये भागीदार किंवा संचालक असल्यास राजीनामा देणे बंधनकारक आहे.
शिवाय निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्थावर आणि जंगम मालमत्ता दाखवणे बंधनकारक आहे, परंतु तावडे यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप निरुपम यांनी केला आहे. मुख्यमंत्री तावडे यांना मंत्रीपदावरून दूर करत नाहीत, तोपर्यंत
आंदोलन सुरूच राहणार आहे,
असेही काँग्रेसने म्हटले आहे. (प्रतिनिधी)