Join us

विएन्नार आणि इस्प्राव्हा बिल्डरांची करचुकवेगिरी, आयकर विभागाची छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 6:07 AM

मुंबई व गोव्यासह देशभरात ३१ ठिकाणी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: देशातील विविध प्रमुख शहरांत आलिशान गृहनिर्माण प्रकल्प साकारणाऱ्या विएन्नार आणि इस्प्राव्हा या बिल्डर कंपन्यांनी कर चुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली आयकर विभागाने मुंबई व गोव्यासह देशातील ३१ ठिकाणी छापेमारी केल्याचे वृत्त आहे.

आलिशान घरे व बंगल्यांच्या निर्मितीमधील आर्थिक व्यवहारांत कर चुकवणे व काही मालमत्तादेखील कागदोपत्री न जाहीर करणे असा ठपका आयकर विभागाने त्यांच्यावर ठेवला आहे. गोवा येथील या दोन प्रमुख कंपन्या असून, त्यांचे प्रकल्प देशभरात अनेक ठिकाणी आहेत. याप्रकरणी आयकर विभागाने मुंबई, गोवा, दिल्ली, नोएडा, गुडगाव, अमृतसर, डेहरादून आदी शहरांत ३१ ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीदरम्यान संबंधित कंपन्यांनी कर चुकवेगिरी केल्याच्या अनुषंगाने बरीच माहिती मिळाली, तसेच बेहिशोबी रोख रक्कम व कागदपत्रेदेखील मिळाल्याची माहिती आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. गोवा येथील आयकर विभागाच्या अन्वेषण विभागाने या कारवाईची सुरुवात केली आहे.

टॅग्स :इन्कम टॅक्सधाड