Join us

एअर इंडियाच्या ताफ्यात टॅक्सी बोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 2:01 AM

एअर इंडियाच्या ताफ्यात टॅक्सीबोट सुविधा रुजू झाली आहे.

मुंबई : एअर इंडियाच्या ताफ्यात टॅक्सीबोट सुविधा रुजू झाली आहे. ही सुविधा असलेली जगातील पहिली विमान कंपनी बनण्याचा मान एअर इंडियाला मिळाला आहे.

एअर बस ए ३२० च्या प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या विमानाला टॅक्सिंग रोबोट (टॅक्सीबोट) द्वारे विमानाचे इंजीन बंद असताना धावपट्टीवर नेण्यासाठी ही सुविधा वापरली जाणार आहे. यामध्ये वैमानिकाच्या नियंत्रणाद्वारे सेमी रोबोटिक टोबारद्वारे विमान हलविणे शक्य होते.

एअर इंडियाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांच्या हस्ते नुकतेच दिल्ली येथे एअर इंडियाच्या ताफ्यात ही सुविधा रुजू करण्यात आली. इंजीन बंद करून विमान हलविता येणे शक्य होत असल्याने, अत्यंत महाग अशा विमानाच्या इंधनाची बचत होणार आहे. विमान धावपट्टीवर गेल्यावर इंजीन सुरू करण्यात येईल. सध्या विमानांना धावपट्टीवर नेण्यासाठी या टॅक्सीबोटचा वापर केला जाणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने एअर इंडियाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. हा पर्यावरणपूरक असा हा निर्णय आहे.

विमान धावपट्टीवर नेण्यासाठी लागणाºया इंधनाच्या तब्बल ८५ टक्के इंधनाची बचत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. एअर इंडियाचे संचालक कॅप्टन अमिताभ सिंग यांनी हा पर्यावरणपूरक निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने एअर इंडियातर्फे विविध उपाययोजना आखण्यात येतात. त्यामुळे पर्यावरणाची हानी कमीत कमी होईल, याकडे लक्ष दिले जात आहे.

टॅग्स :एअर इंडिया