Join us  

टॅक्सीचालकांची पडताळणी

By admin | Published: December 12, 2014 2:24 AM

शहरातील सर्वच प्रकारच्या टॅक्सी, ‘टी’ परमिट वाहनांच्या चालकांची पाश्र्वभूमी स्थानिक पोलीस ठाण्यापासून राष्ट्रीय पातळीर्पयत पडताळली जाणार आहे.

जयेश शिरसाट ल्ल मुंबई
शहरातील सर्वच प्रकारच्या टॅक्सी, ‘टी’ परमिट वाहनांच्या चालकांची पाश्र्वभूमी स्थानिक पोलीस ठाण्यापासून राष्ट्रीय पातळीर्पयत पडताळली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी मुंबई पोलीस स्टेट व नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची मदत घेणार आहेत. कितीही वेळ लागला तरी मुंबईत वाहन चालविणा:या चालकाविरोधात देशात कुठे गुन्हा नाही ना हे पडताळणारच, असा निर्धार मुंबई पोलिसांनी केला आहे.
दिल्लीतील उबर टॅक्सीत तरुणीवर घडलेल्या बलात्काराची घटना मुंबई पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. मुंबईत अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काळ्या-पिवळ्या, खासगी टॅक्सी (अॅपबेस्ड, फ्लीट) आणि टी परमिटची वाहने चालविणा:या चालकांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी तपासण्याचा निर्धार मुंबई पोलिसांनी केला आहे. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविताना लाखो चालक, मालकांची पाश्र्वभूमी तपासावी लागणार आहे. त्यात वेळ आणि मनुष्यबळ खर्ची पडणार आहे. त्यामुळे हा उपक्रम सुलभ, कमीतकमी वेळेत कसा राबविता येईल हे ठरविण्यासाठी गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या दालनात वरिष्ठ आयपीएस अधिका:यांची बैठक झाली. त्यात या उपक्रमाविषयी विस्तृत माहिती देण्यात आली.
एका वरिष्ठ अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, ही तपासणी चार पातळ्यांवर होईल. चालक ज्या परिसरात वास्तव्य करतो तेथील पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा/गुन्हे नोंद आहेत का, हे तपासले जाईल. दुस:या टप्प्यात शहर पातळीवर, तिस:या टप्प्यात 
राज्य पातळीवर आणि अखेरच्या टप्प्यात देशपातळीवर संबंधित चालकाची पाश्र्वभूमी पडताळली जाईल.
2क्1क् ते आतार्पयत शहरात दाखल झालेले गुन्हे, त्यातले आरोपी आणि या गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले आरोपी अशी इत्थंभूत माहिती मुंबई गुन्हे शाखेकडे आहे. त्याआधीच्या नोंदी शोधण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांकडील उपलब्ध माहितीचा वापर केला जाईल. तर स्टेट क्राईम रेकॉर्ड ब्युरो आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे उपलब्ध असलेल्या माहितीवरून शहरातल्या चालकांची राज्य व देशपातळीवर पाश्र्वभूमी तपासली जाणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिका:याने ‘लोकमत’ला दिली.
फ्लीट टॅक्सी, टी परमिटवाले चालक पहिल्या टप्प्यात 
मेरू, टॅब कॅब, ईझी अशा फ्लीट टॅक्सींचे चालक आणि आरटीओचे टी परमिट (टुरीस्ट परमिट) असलेली वाहने चालविणा:या चालकांची पहिल्या टप्प्यात झाडाझडती होणार आहे. त्यानंतर शहरात धावणा:या काळ्या-पिवळ्या टॅक्सी व अन्य टॅक्सींच्या चालकांचा नंबर लागेल.
मुंबई पोलीस खासगी टॅक्सी कंपन्या, आरटीओ आणि चालक-मालक संघटनांकडून चालकांची माहिती घेणार आहेत. शहरात टॅक्सी सेवा पुरविणा:या तब्बल 28 खासगी कंपन्यांसोबत पत्रव्यवहार करून चालकांची माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
 
चालकाची माहिती पडताळण्याचे काम पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या बीट मार्शलवर सोपविण्यात आल्याचे समजते. हे बीट मार्शल संबंधित चालक त्याच पत्त्यावर राहतो का हे प्रत्यक्ष पत्त्यावर जाऊन पडताळणार आहेत. राहत असल्यास परिसरात चौकशी करणार आहेत, असे समजते.
 
अशी शोधणार पाश्र्वभूमी : पोलीस ठाणो, गुन्हे शाखा, स्टेट क्राईम रेकॉर्ड ब्युरो, नॅशलन क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडून आजवर दाखल झालेले गुन्हे, त्यातले आरोपी, शिक्षा झाली किंवा कसे या डिजिटल, कॉम्प्युटराईज्ड माहितीत टॅक्सीचालकाचे नाव आहे का हे पोलीस तपासणार आहेत. नाव असल्यास त्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप, त्याला झालेली शिक्षा या आधारे भविष्यातील प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
 
कारवाई : गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांचा चालक परवाना रद्द केला जाईल किंवा त्यांना तडीपार 
केले जाईल. किरकोळ गुन्हे नोंद असलेल्यांविरोधात बॉन्ड लिहून घेतले जातील, अशी प्रतिबंधात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. 
 
अडथळा
आरटीओकडे डिजिटल डाटा नाही : चालकांची पाश्र्वभूमी तपासण्याचा निर्णय झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आरटीओकडे माहिती मागितली. तेव्हा आरटीओने कॉम्प्युटराईज्ड किंवा डिजिटल पद्धतीने माहिती साठवलेली नाही हे वास्तव समोर आल्याचा दावा एका वरिष्ठ अधिका:याने ‘लोकमत’कडे केला. त्यामुळे लाखो चालकांचे फॉर्म किंवा फाईल्स (हार्ड कॉपी) तपासणो शक्य नसल्याचे या अधिका:याने सांगितले.
 
देशपातळीवरील रेकॉर्ड शोधण्यासाठी त्या-त्या राज्यांशी संपर्क साधणो शक्य नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे दाखल गुन्हे, आरोपी, कोणाला शिक्षा झाली याची माहिती उपलब्ध आहे. या माहितीत मुंबईतले चालक आहेत का हे तपासले जाईल. महाराष्ट्र सीआयडी विभागांतर्गत कार्यरत असलेला स्टेट क्राईम रेकॉर्ड ब्युरो केंद्राच्या धर्तीवर राज्यातल्या गुन्ह्यांची इत्थंभूत माहिती जतन करतो. या माहितीचीही मदत राज्य पातळीवरील गुन्हेगारी पाश्र्वभूमी तपासण्यासाठी होईल.
- केएमएम प्रसन्ना, 
अप्पर आयुक्त (गुन्हे)