Join us

महिला सक्षमीकरणासाठी टॅक्सी चालविण्याचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:06 AM

मुंबई : महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून, जागतिक महिला ...

मुंबई : महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून, जागतिक महिला दिनानिमित्त वडाळा विभागात २१ महिलांना टॅक्सी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वडाळा विभाग अध्यक्षा अनामिका बोरकर म्हणाल्या की, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून हे टॅक्सी चालविण्याचे प्रशिक्षण सुरू केले आहे. या महिलांना वाहन चालविण्याचा परवानाही मिळणार आहे. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला स्वतःच वाहन घेण्यास इच्छुक असतील तर बँकेकडून त्यांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बऱ्याच नामांकित कंपन्या त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी कॅब किंवा चारचाकी वाहन उपलब्ध करून देतात, ज्याचे चालक स्वतः महिलाच असतील तर अशा महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे.