भाडे नाकारल्याने टॅक्सी, रिक्षाचलकांवर 'संक्रांत'; परवाना निलंबित, आरटीओकडून कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 05:40 PM2023-10-18T17:40:44+5:302023-10-18T17:40:59+5:30
मुंबईत रिक्षा टॅक्सीचालकांकडून भाडे नाकारले जात असल्याच्या अनेक घटना घडताना दिसतात.
मुंबई-
मुंबईत रिक्षा टॅक्सीचालकांकडून भाडे नाकारले जात असल्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. रात्री-बेरात्री भाडे नाकारले जाणे असो किंवा मग जवळचे नाकारले जाणे असो, यामुळे मुंबईकरांना अनेकदा त्रासाला सामोरे जावे लागते.
प्रवाशांना तक्रारीसाठी आरटीओ कार्यालयांनी व्हॉट्सअॅप क्रमांक आणि ई-मेल आयडी दिला आहे. त्यावर आतापर्यंत ९०० हून अधिक तक्रारी आल्या असून त्यातील ७०५ तक्रारी या भाडे नाकारण्याच्या आहेत.
प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन तपासात दोषी आढळणाऱ्या रिक्षा, टॅक्सीचालकांवर अनुज्ञप्ती निलंबन, परवाना निलंबन आणि दंडात्मक कारवाई केली जात आहे.
- विनय अहिरे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, वडाळा आरटीओ
एकतर रिक्षाचालकांनी भाडे नाकारले तर आधीच चिडचिड होते आणि त्यात एखाद्या महत्वाच्या कामासाठी जायचे असेल तर वाद घालण्यातही काही उपयोग वाद घालण्यातही काही उपयोग नसतो. रिक्षा, टॅक्सीचालक अनेकदा लांबपल्ल्याच्या भाड्यासाठी जवळचे भाडे कारतात.