खरीपासाठी टीडीसी देणार पीक कर्ज

By admin | Published: July 3, 2014 02:36 AM2014-07-03T02:36:46+5:302014-07-03T02:36:46+5:30

वार्षिक पत आराखडयानुसार जिल्हयाचे खरीप आणि रब्बी पीक कर्ज वाटपाचे २४७ कोटींचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६७ टक्के म्हणजेच १६५ कोटींचे उद्दीष्ट

TDC to Peak Loan for Kharif | खरीपासाठी टीडीसी देणार पीक कर्ज

खरीपासाठी टीडीसी देणार पीक कर्ज

Next

जितेंद्र कालेकर, ठाणे
वार्षिक पत आराखडयानुसार जिल्हयाचे खरीप आणि रब्बी पीक कर्ज वाटपाचे २४७ कोटींचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६७ टक्के म्हणजेच १६५ कोटींचे उद्दीष्ट होते. त्यानुसार बँकेने चालू खरीप हंगामासाठी १७५ कोटींच्या कर्जाला मंजूरी दिली असून त्यापैकी १०७.८५ कोटींचे पीक कर्ज बँकेने वाटप केल्याची माहिती बँकेचे चेअरमन देवीदास पाटील यांनी दिली.
खुल्या अर्थव्यवस्थेमुळे बँकींग क्षेत्रातील अनेक आव्हाने आणि स्पर्धेला तोंड देत बँकेने प्रगतीचा आलेख उंचावला आहे. नुकत्याच संपलेल्या ३१ मार्च २०१४ च्या आर्थिक वर्षात बँकेने चांगली प्रगती साधली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत ठेवींमध्ये ३५० कोटींची वाढ केली.
त्यामुळे या ठेवी आता ४३७.0२ कोटीपर्यन्त गेल्या आहेत. जिल्हयातील ५७ शाखांमधून बँकेने ३० जून २०१४ पर्यन्त २३ हजार ३७१ शेतकऱ्यांना १७५ कोटीपैकी १०७ कोटींचे पीक कर्ज वाटप केले. यामध्ये किन्हवली शाखेने सर्वाधिक म्हणजे आठ कोटी ५६ लाख २० हजारांचे २,५८३ सभासदांना त्यापाठोपाठ कुडूस शाखेने १,४४६ सभासदांना आठ कोटी ४७ लाख ५६ हजार तर वाडा येथून १६६३ सभासदांना आठ कोटी २३ लाख दहा हजारांचे कर्ज दिले आहे. बँकेचा मागील २०१३ - २०१४ या खरीप हंगाम वर्षातही ९७ कोटींचा इष्टांक आहे.

Web Title: TDC to Peak Loan for Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.