Join us

सातव्या वेतन आयोगासाठी शिक्षक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:43 AM

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक परिषदेने, बुधवारी, २ आॅगस्ट रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलनाची हाक दिली आहे.

मुंबई : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक परिषदेने, बुधवारी, २ आॅगस्ट रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात सातवा वेतन आयोग लागू करण्याची शिक्षक परिषदेची प्रमुख मागणी असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.बोरनारे म्हणाले की, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन केलेले आहे. सातव्या वेतन आयोगासह जुनी पेन्शन योजना लागू करा व कला क्रीडा शिक्षकांच्या तासिका पूर्वीप्रमाणे पूर्ववत करा, या शिक्षकांच्या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत, तर वरिष्ठ व निवडश्रेणी विनाअट द्या, नियुक्तीच्या मान्यता रद्द न करता, जबाबदार अधिकाºयांवर कारवाई करा, घोषित व विनाअनुदानित शाळांना तत्काळ अनुदान देण्याचे धोरणात्मक निर्णयही शासनदरबारी अडकून पडले आहेत.शिक्षकेतरांचा आकृतिबंध व ग्रंथपाल वेतनश्रेणीत सुधारणा, अपंग समावेशित शिक्षकांना नियमित व थकीत वेतन, आयसीटी शिक्षकांना सेवा संरक्षण, रात्र शाळेतील शिक्षकांना पूर्ण शाळांचा दर्जा, असे बरेच प्रश्न शिक्षणमंत्र्यांकडे प्रलंबित आहेत.याशिवाय १ तारखेला राष्ट्रीयीकृत बँकेतून संपूर्ण राज्यात शिक्षक व शिक्षकेतर पगार व्हावा,या मुद्द्याची चर्चाही करायची आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी विविध प्रश्नांवर चर्चा करावी, म्हणून मुंबईसह राज्यातील शेकडो शिक्षक धरणे आंदोलनात सहभागी होतील, असा दावा बोरनारे यांनी केला आहे.या आंदोलनात आमदार नागो गाणार, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांसह सरकार्यवाह नरेंद्र वातकर आणि प्रमुख पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती देण्यात आली आहे.